उन्हाळ्यात मोजे घालताय; सावधान...होऊ शकतं तुमचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:43 PM2019-04-05T18:43:11+5:302019-04-05T18:44:57+5:30

थंडी असो किंवा उन्हाळा, मोठी माणसं असो किंवा लहान मुलं, सर्वांना दिवसभर सॉक्स वापरावे लागतात. अनेक शाळांमध्ये तर ड्रेस कोड असतो, त्यामुळे सॉक्स वापरणं बंधनकारक असतं.

Do you know the side effects of wearing socks all day in summer | उन्हाळ्यात मोजे घालताय; सावधान...होऊ शकतं तुमचं नुकसान

उन्हाळ्यात मोजे घालताय; सावधान...होऊ शकतं तुमचं नुकसान

Next

थंडी असो किंवा उन्हाळा, मोठी माणसं असो किंवा लहान मुलं, सर्वांना दिवसभर सॉक्स वापरावे लागतात. अनेक शाळांमध्ये तर ड्रेस कोड असतो, त्यामुळे सॉक्स वापरणं बंधनकारक असतं. अनेकदा ऑफिसमध्ये जातानाही दिवसभरासाठी सॉक्स वापरण्यात येतात. कधीकधी घरी येण्यासाठी उशिर झाला तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पायामध्ये सॉक्स तसेच असतात. पण असं करणं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. उन्हाळ्यामध्ये ज्या व्यक्ती टाइट सॉक्स वेअर करतात. त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

दिवसभर सॉक्स वेअर केल्यानं होणारं नुकसान :

- जास्त टाइट सॉक्स वेअर केल्याने पायांना सूज येते. तसेच पायांमध्ये ब्लड सर्क्युलेशन कमी होतं. यामुळे अस्वस्थ वाटतं आणि शरीरामध्ये उष्णता वाढते. 

- जर तुम्ही सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पायातून सॉक्स काढत नसाल तर पायांना त्रास होतो. तसेच पायांच्या टाचा, पंजा यांसारखे भाग सुन्न होतात. 

- काही लोक कॉटनचे सॉक्स वापरत नाहीत. स्वस्त सॉक्स वापरल्याने त्वचा खराब होऊ शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत सॉक्स वापरल्याने पायांना घाम येतो. शूजच्या आतमध्ये तळवा बंद असल्याने जास्त घाम येतो. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तसेच पायांची त्वचाही खराब होते. 

- जास्त टाइट सॉक्स वापरल्याने वेरिकोज वेन्सची समस्या होऊ शकते. ज्यांना हा त्रास आधीपासूनच आहे, त्यांना सॉक्स वेअर करताना सावध राहणं गरजेचं असतं. 

- उन्हाळ्यामध्ये सतत सॉक्स वेअर केल्याने पायांमध्ये अधिक घाम येतो. ज्यामुळे शूज काढल्यानंतर दुर्गध येतो. उत्तम राहिल की चांगल्या क्वालिटीचे सॉक्स घ्या. त्यानंतर प्रत्येक दिवशी ते स्वच्छ करा. एकदा वेअर केलेले सॉक्स पुन्हा वेअर करू नका. शूज उन्हामध्ये ठेवा. 

- सॉक्स वेअर केल्यानंतर पायांवर निशाण येतात. खाज, रेड रॅशेज, जळजळ होणं यांसारख्या समस्या साधारण आहेत. अशातच पायांची स्वच्छता राखा. इन्फेक्शन जर जास्त झालं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

 

Web Title: Do you know the side effects of wearing socks all day in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.