गुलाबी आणि पांढऱ्या पेरूमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 09:26 AM2022-09-20T09:26:30+5:302022-09-20T09:27:57+5:30
Which is Better Pink or White Guava: याबाबत न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन काय विचार करतात हे तुम्हाला माहीत आहे का? गुलाबी आणि पांढरा यातील कोणता पेरूम जास्त फायदेशीर ठरतो? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
Which is Better Pink or White Guava: आता बाजारात पेरू सहजपणे मिळू लागले आहेत. भरपूर पोषक तत्व असलेले पेरू आल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. यात व्हिटॅमिन सी, लायकोपीन आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्सचं प्रमाण अधिक असतं. पेरूमध्ये आढळणारं मॅगनीज आहारातील आवश्यक पोषक तत्व शोषूण घेण्यास मदत करतं. तर यातील फोलेट प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करतं. पेरूच्या व्हेरायटीमुळेही शरीराला जास्त फायदा होतो. पण याबाबत न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन काय विचार करतात हे तुम्हाला माहीत आहे का? गुलाबी आणि पांढरा यातील कोणता पेरूम जास्त फायदेशीर ठरतो? चला जाणून घेऊ याचं उत्तर...
पेरूचे फायदे?
डायटिशिअन्सचं मत आहे की, पेरू ब्लडमध्ये ग्लूकोज लेव्हल ठीक करण्यास मदत करतो. पेरूमध्ये कॅल्शिअमही खूप आढळतं. जे हाडांना मजबूती देतं. तसेच याच्या सेवनाने पचन तंत्रही चांगलं राहतं. त्यासोबतच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी करण्यासाठीही पेरू फायदेशीर ठरतो.
पांढरा की गुलाबी, कोणता जास्त फायदेशीर?
डायटिशिअन्स सांगतात की, पांढऱ्या पेरूच्या तुलनेत गुलाबी पेरूमध्ये शुगर आणि स्टार्चचं प्रमाण कमी असतं. गुलाबी पेरूच्या तुलनेत पांढऱ्या पेरूमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटचे गुण अधिक आढळून येतात. पण डायटिशिअन्स सांगतात की, शरीरासाठी गुलाबी पेरू जास्त चांगला असतो. गुलाबी पेरूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतात.
त्यासोबतच यात ओमेगा 3 आणि ओमेगा 6 पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडही आढळून येतं. ओमेगा 3 आणि ओमेगा 6 इम्यूनिटी वाढतात. यामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होतो. यात आढळणारं फायबर डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतं. फायबर पचनक्रिया ठीक करतं. बद्धकोष्टतेपासून वाचवतं आणि पोट साफ करण्यास मदत करतं.