तुम्हाला आनंदी राहण्याची सायकॉलॉजी माहीत आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:37 PM2018-10-08T12:37:53+5:302018-10-08T12:47:13+5:30
अनेकदा काही लोकांना आपण पाहतो की, सगळंकाही असूनही ते खूश नसतात. खूश राहणं ही एक सायकॉलॉजिकल क्रिया आहे.
(Image : www.thriveglobal.com)
अनेकदा काही लोकांना आपण पाहतो की, सगळंकाही असूनही ते खूष नसतात. खूश राहणं ही एक सायकॉलॉजिकल क्रिया आहे. त्यामुळे याबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सायकॉलॉजिला जाणून घेऊ शकत नसाल तर तुम्ही कधीही खूष राहू शकणार नाहीत.
कधी कधी असेही बघायला मिळते की, लोक स्वत:बाबत फार नकारात्मक असतात. नकारात्मकता येताच तुमच्या जीवनात दु:खाचा प्रवेश होतो. अशात आम्ही तुम्हाला सायकॉलॉजिकल बाबी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला खूष राहण्यापासून दूर ठेवतात. चला जाणून घेऊ खूष राहण्याची सायकॉलॉजी.
काळजी करण्याची सवय
काळजी करण्याची सवय व्यक्तीच्या दु:खाचं मोठं कारण असू असतं. अनेकदा आपण पाहतो की, आपण दुसऱ्यांचा फार जास्त विचार करतो आणि दु:खी होतो. कधी कधी कुणी तुमची काळजी घेत नाही हे बघूनही दु:ख होतं. यो दोन्ही सवयींमधून वेळीच बाहेर यायला हवं कारण या सवयींमुळे तुम्हाला दु:ख होतं. त्यामुळे फार काळजी करणे सोडा.
तुलनात्मक दृष्टीकोन
अलिकडे लोक फार जास्त तुलनात्मक विचार करुन जगत आहेत. सोशल मीडियामुळे हा तुलनात्मक प्रभाव अधिकच वाढवला आहे. अनेकदा लोक सोशल मीडियातील इतर लोकांच्या वागण्याची स्वत:शी तुलना करु लागतात आणि याने निराश होतात. या समस्येतून जितकं जमेल तितकं लगेच बाहेर या.
सल्ला दिल्यावर कुणी दुर्लक्ष करणे
अनेकांची ही सवय असते की, त्यांना कोणत्याही विषयात सल्ला द्यायचा असतो. अनेकदा हे पाहिलं गेलंय की, जर काहींनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं गेलं किंवा तो ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं गेलं तर त्यांना दु:ख होतं. पण तुम्ही दिलेला सल्ला ऐकलाच गेला पाहिजे किंवा लोकांनी तसंच वागलं पाहिजे हा विचार तुम्ही करताच का? सल्ला देणं तुमचं काम आहे, तो ऐकायचा कि नाही हे समोरच्या व्यक्तीचं काम. त्यामुळे या विचारातून बाहेर या.
स्वत:वर प्रेम करा
स्वत:वर प्रेम करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. दुसऱ्या कुणाला उत्तर देण्यापेक्षा आधी स्वत:ला उत्तर देणं शिका. जर जीवनात तुम्ही आनंदी राहण्याचा मार्ग शोधत असाल तर स्वत:वर प्रेम करायला शिका. याने तुम्ही वेगवेगळ्या तुलनांमधून आणि दु:खातून बाहेर याल.
बदलासाठी तयार रहा
बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि जेव्हा तुम्ही हा बदल समजू शकत नाहीत तेव्हा तुम्ही दु:खी राहता. जीवनात जे काही बदल होताहेत ते स्विकार करा आणि खूष राहण्याचा प्रयत्न करा. बदलांमुळे तुमचा तणावही कमी होतो.