शिंकताना डोळे बंद का होतात 'हे' तुम्हाला माहित आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:57 PM2018-07-05T16:57:06+5:302018-07-05T17:05:16+5:30
आपल्याला शिंका येणे ही गोष्ट तशी फार कॉमन आहे. शिंका कधीही येतात मग आपण ऑफिसमध्ये असलो किंवा घरी असलो काय. बऱ्याचदा सकाळी उठल्यावर आपण शिकांनी हैराण होतो. शिंका येण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी तर अॅलर्जीमुळेही शिंका येतात.
आपल्याला शिंका येणे ही गोष्ट तशी फार कॉमन आहे. शिंका कधीही येतात मग आपण ऑफिसमध्ये असलो किंवा घरी असलो काय. बऱ्याचदा सकाळी उठल्यावर आपण शिकांनी हैराण होतो. शिंका येण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी तर अॅलर्जीमुळेही शिंका येतात. सटासट शिंका येऊन गेल्यानंतर जरा कुठे बरे वाटते. पण कधी विचार केलाय का, की शिंकताना आपले डोळे का बंद होतात? याबाबत अनेक गैरसमज आहेत. असेही म्हणतात की, शिंकताना डोळे बंद नाही केले तर डोळे बाहेर येतात. आपण जाणून घेऊयात याचे नक्की कारण काय आहे...
शिंका का येतात -
शिंका आपल्या श्वसननलिकेला साफ ठेवण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा श्वसनात अडथळा निर्माण करणारे घटक श्वसननलिकेत अडकतात. त्यावेळी मेंदूतील त्रिमितीय मज्जातंतूना संदेश पाठवतात. यावेळी आपली फुफ्फुसे जास्त प्रमाणात ऑक्सिजन साठवतात आणि ते घटक शिंकेमार्फत बाहेर फेकले जातात.
शिंकताना डोळे का बंद होतात?
शिंका येण्याआधी आपले शरिर स्वतः त्या प्रक्रियेसाठी तयार होते. यादरम्यान छातीचे स्नायू टाइट होतात. शिंका येण्यासाठी मेंदूतील त्रिमितीय मज्जातंतू जबाबदार असतात. त्यांचे नियंत्रण डोळे, नाक, तोंड आणि जबड्यावर असते. यामुळेच शिंका आल्यावर या सर्व अवयवांच्या स्नायूंवर प्रभाव पडतो. त्यामुळे शिंकताना आपले डोळे बंद होतात. तसेच याव्यतिरिक्त हवेतील विषाणूंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी डोळे बंद होत असल्याचे सांगण्यात येते.