खूप वेळ उभे राहून कामे करता? मग सावध व्हा! चांगल्या आराेग्यासाठी चालत राहा, व्यायाम करा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 09:13 AM2024-10-20T09:13:10+5:302024-10-20T09:13:59+5:30
काही मान्यतांना त्यातून छेद देण्यात आला आहे.
सिडनी: अनेक जणांना कामाच्या ठिकाणी बराच वेळ उभे राहावे लागते. काही कामे अशी असतात, जी उभ्यानेच करावी लागतात. काहीजण चांगल्या आराेग्यासाठी उभे राहून काम करतात. मात्र, दाेन तासांपेक्षा जास्त असे उभे राहिल्यामुळे व्हेरिकाेज व्हेन्स, तसेच डीप व्हेन्स थ्राॅम्बाॅसिस यासारखे आजार हाेण्याची शक्यता बळावते. सिडनी विद्यापीठाने केलेल्या संशाेधनातून ही माहिती उघड झाली आहे. या संशाेधनाातील माहिती ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ इपिडेमियाॅलाॅजी’मध्ये प्रकाशित झाली आहे. काही मान्यतांना त्यातून छेद देण्यात आला आहे.
संशाेधनातून काय कळाले?
- जास्त वेळ उभे राहून काम केल्याने गतिहीन जीवनशैलीत सुधारणा हाेणार नाही.
- जास्त वेळ उभे राहून हृदयाचे आराेग्य चांगले हाेत नाही. उलट रक्ताभिसरणासंबंधी धाेका वाढताे.
- हृदयविकाराचा झटका, हृदय बंद पडणे किंवा इतर धाेके उभे राहिल्यामुळे कमी हाेत नाहीत.
असे केले संशाेधन
ज्यांना हृदय राेग नव्हता, अशा लाेकांवर सुरुवातीच्या टप्प्यात संशाेधन करण्यात आले. त्यांच्या मनगटावर एक उपकरण लावण्यात आले हाेते. दाेन तासांपेक्षा जास्त वेळ उभे राहिल्यास रक्ताभिसरणासंबंधी धाेका ११ टक्क्यांनी वाढताे.
काय काळजी घ्यावी?
जे लाेक बराच वेळ बसून राहतात, त्यांनी अधूनमधून उठायला हवे आणि नियमित व्यायाम करायला हवा. कामाच्या ठिकाणी नियमित ब्रेक घ्यायला हवा. थाेडा वेळ पायी चाला, पायऱ्यांचा वापर करा.