तुम्ही स्वतःला गुगल डॉक्टर समजता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 05:20 PM2017-10-30T17:20:34+5:302017-10-30T17:21:26+5:30

स्व-निदान करण्याचा खेळ अनेकजण करतात, सतत गुगल करकरुन आजाराची माहिती घेतात, परिणाम?

Do you think you're a Google Doctor, right? | तुम्ही स्वतःला गुगल डॉक्टर समजता का?

तुम्ही स्वतःला गुगल डॉक्टर समजता का?

Next

- निशांत महाजन

आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर काही टेस्ट करायला सांगतात. त्या करतो. आणि ती सगळी माहिती गुगलवर टाकून स्वतःला  काय झालं आहे याचं निदान करण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टरांनी निदान केलं तर आपल्याला नेमका काय आजार झाला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न  करत इतर आजारी लोकांचे अनुभव वाचतो. त्यानं डोकं भंजाळून घेतोच. घाबरतो. इतरांना घाबरवतो. आपल्याला काहीतरी गंभीरच आजार झालेला आहे असं स्वतर्‍च ठरवतो. आणि त्यावर इतर अनेक पेशण्टने सुचवलेले उपचारही करायला लागतो. हे सारं घातक आहे हे कधी आपल्या मनातही येत नाही.
पूर्वी असं होतं का, आपण डॉक्टरवर विश्वास ठेवायचो. त्यांनी सांगितलेली पत्थ्यं पाळायचो. मात्र आता आपल्याकडे फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाच उरलेली नाही. साध्या साध्या गोष्टींसाठीही लोक स्पेशलिस्टकडेच जातात. शे पन्नास टेस्ट केल्या जातात. आणि त्यातून काही रिपोर्ट हाती येतात. अर्थात त्या रिपोर्टवरही लिहिलेलं असतं की काही गोष्टी संदर्भानं घ्याव्यात.
पण आपण तसं न करतात ते सारं गुगलवर ताडून पाहतो. साधं पित्त झालं तरी उपचार गुगलवर तपासतो. ते औषधं घेतो, मेडिकल स्टोअरमध्ये जावून औषधं घेतो. अनेकजण तर लहान मुलांनाही अशी औषधं देतात. घरगुती उपाय करतात.
आणि चिंतेत बुडून जातात की आपल्याला काहीतरी भयंकर गंभीर आजार झालेला आहे.
इथवरही सारं ठीक. मात्र काहीजण तर डॉक्टरांना प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. त्यांना माहिती देतात. मला हेच झालं नसेल कशावरुन असं विचारतात. डॉक्टर जे औषधं देतात त्यांचे साइड इफेक्ट्स काय याचीही माहिती गुगलवरुन घेतात आणि त्याविषयी डॉक्टरांना कचाटय़ात पकडतात.
म्हणजे माहिती हाताशी असू नये असं नाही पण माहिती वाचणं वेगळं, ती कोरिलेट करुन निदान करणं वेगळं. निदान इतकं सोपं असतं तर डॉक्टरांची गरजच काय होती. पण असा सारासार विचार न करता गुगल डॉक्टर होतात अनेकजण.
हे स्वत:च्या संदर्भात चालतं तोवर ठीक, मात्र काहीजण इतरांना फुकट सल्ले देतात. त्यांनाही आपलं गुगल ज्ञान वाटतात. त्यातून जे गुंते होतात ते वेगळे.
आपल्या जीवाशी खेळू नये. स्व उपचार आणि गुगल ग्यानचे प्रयोग स्वत:वर करणं धोक्याचं ठरू शकतं.

Web Title: Do you think you're a Google Doctor, right?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.