काय तुम्ही घरी जाऊनही घेता ऑफिसच्या कामाचं टेन्शन!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 04:09 PM2018-09-07T16:09:44+5:302018-09-07T16:10:03+5:30
तेव्हा ऑफिसच्या कामातून स्वत:ला वेगळं करणे फार कठीण गोष्ट ठरते. डेडलाइन्स आणि कॉम्पिटिशनमुळे स्थिती आणखी खराब होते.
जर तुम्हाला वर्क-लाइफमध्ये परफेक्ट बॅलन्स हवा असेल तर गरजेचे आहे की, घरी गेल्यानंतर स्वत:ला ऑफिसच्या कामापासून वेगळं ठेवा. तशी ही गोष्ट बोलायला जितकी सोपी आहे फॉलो करायला तितकीच कठीण आहे. जेवाह आपण घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवतो, तेव्हा ऑफिसच्या कामातून स्वत:ला वेगळं करणे फार कठीण गोष्ट ठरते. डेडलाइन्स आणि कॉम्पिटिशनमुळे स्थिती आणखी खराब होते. परफेक्ट बॅलन्स कठीण आहे पण काही गोष्टींची काळजी घेतली तर हे काम सोपं केलं जाऊ शकतं.
फॉलो करु शकाल असा प्लॅन करा
हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. जसे करिअर गोल ठरवले जातात तसेच ऑफिस आणि घर यांच्यात बॅलन्स करण्यासाठीही गोल ठरवावे लागतात. पण गोल असे ठरवा जे फॉलो करणे सोपे जाईल. जर मित्रांसोबत काही वेळ घालवून तुम्ही रिलॅक्स फिल करत असाल तर असे करण्यास जराही निष्काळजीपणा करु नका. जर तुम्ही ऑफिसमध्ये केवळ आठ तास काम करायचं आहे आणि ओव्हरटाइम नाही करायचाय याबाबत क्लिअर रहा.
सीमा आखून घ्या
हे कामही कठीण आहे. सतत मागणी करणारा बॉस आणि सहकाऱ्यांसोबत सुरु असलेली स्पर्धा पाहता ऑफिसचं काम ऑफिसमध्येच सोडून येणे तसे कठीण आहे. मेल चेक करणे किंवा फोनवर कामाबाबत बोलणे ही अशी कामे आहेत जी घरी येऊनही तुमचा मूड बिघडवू शकतात. इमरजन्सीवेळी घरून काम केलेलं चालतं पण याची सवय लावून घ्याल तर याने तुमचं वर्क लाइफ बॅलन्स नक्कीच बिघडतं.
डिस्क्नेक्ट राहणं गरजेचं
कामाशी संबंधित ई-मेल आणि फोन कॉल्सना उत्तर देतेवेळी एकदा विचार करा की, काय या कॉल्सला उत्तर देणे एक दिवस टाळले जाऊ शकते? जर उत्तर हो असेल तर फोन सायलेन्ट मोडवर ठेवा. झोपण्याआधीही ई-मेल इत्यादी चेक करु नका, याने तुमचा स्ट्रेस वाढेल.
ऑफिस वेळेत पर्सनल कामे बंद
सोशल मीडियाची धुंदी इतकी असते की, यावर कितीही वेळ घालवला तरी माहिती पडत नाही. याने तुमचं कामावर लक्ष केंद्रीत होत नाही आणि याने कामावर परिणाम होतो. जर आपण सोशल मीडियावर वेळ घालवत राहिलो तर अर्थातच काम वेळेत पूर्ण होणार नाही. ऑफिस वेळेत तुमचं सोशल मीडिया नोटिफिकेशन बंद ठेवाल तर योग्य होईल.
ओव्हर कमिटमेंट करु नका
चांगल्या कामाचा अर्थ हा नाही की, आपले मॅनेजर किंवा बॉस जे काही एक्स्ट्रा काम देतील ते आपण घेत जावं. कधी कधी तुमच्या करिअर ग्रोथसाठी हे चांगलं होऊही शकेल पण सतत असे केल्याने तुमची पर्सनल लाइफ प्रभावित होऊ शकते. यासाठी पर्सनल स्पेसला प्रायोरिटी देऊन कामाचं ओव्हर कमिटमेंट करु नका.
वेळेचं महत्त्व जाणा
जर ऑफिससाठी काही तास फिक्स केले गेले आहेत तर याचा अर्थ हा होतो की, तुम्ही वेळेवर ऑफिसला पोहोचा आणि वेळेवर काम पूर्ण करा. हे काम जरा कठीण होऊ शकतं, पण अशक्य नाहीये.