रात्री शिल्लक राहिलेली चपाती शिळी म्हणून फेकता? डॉक्टरांनी सांगितलेले फायदे वाचून रोज खाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 12:27 PM2024-09-03T12:27:36+5:302024-09-03T12:28:09+5:30
अनेकांना हे माहीत नसतं की, शिल्लक राहिलेली चपाती ही कधीच शिळी होत नसते उलट ती आणखी पौष्टिक होते.
चपाती हा भारतीय लोकांच्या आहारातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्यांचं सेवन केलं जातं. बरेच लोक सकाळी नाश्त्यामध्येही चपाती खातात. अनेकदा असं होतं की, रात्री काही चपात्या शिल्लक राहतात आणि सकाळी त्या शिळ्या होतात. बरेच लोक दुसऱ्या दिवशी शिळ्या चपात्या खाणं टाळतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, शिल्लक राहिलेली चपाती ही कधीच शिळी होत नसते उलट ती आणखी पौष्टिक होते. तुम्हाला हे अजब वाटू शकतं, पण सत्य हेच आहे की, ताज्या चपातीपेक्षा शिळी चपाती अधिक पौष्टिक असते.
जर तुम्हीही आदल्या दिवशी शिल्लक राहिलेली चपाती खाणं पसंत करत नसाल तर आज तुम्हाला याचे काही फायदे सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही कधीच शिळ्या चपात्या फेकून देणार नाहीत. हेल्थ एक्सपर्ट डॉक्टर रेखा यांनी शिळी चपाती खाण्याचे काही जबरदस्त फायदे सांगितले आहेत.
शिळी चपाती अधिक पौष्टिक
जेव्हा चपाती शिळी होते तेव्हा ती हलक्या फर्मेंटेशन प्रक्रियेतून जाते. ज्यामुळे या चपातीमध्ये पोषक तत्व वाढतात. फर्मेंटेड फूड्स प्रोबायोटिकसाठी ओळखले जातात. यांनी आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. चपात्यांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतात जे एनर्जी वाढवतात आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात.
भरपूर आयर्न आणि झिंक
शिळ्या चपातीमध्ये भरपूर आयर्न आणि झिंक असतं. फर्मेंटेशनने कडधान्यामध्ये आढळणारं तत्व फायटेटला कमी करतात. कारण याने मिनरल्सचं अवशोषण रोखलं जातं. ताज्या चपात्यांमधूनही भरपूर मिनरल्स मिळू शकतात. पण शिळ्या चपात्यांचे आपले वेगळेच फायदे आहेत.
पोटासाठी फायदेशीर शिळी चपाती
शिळ्या चपातीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे आपलं पचन तंत्र मजबूत करण्यास मदत करतं. शिळी चपाती खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि पचनही लवकर होते. तसेच शिळी चपाती खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते.
वजन होतं कमी
जर तुम्ही नेहमीच शिळ्या चपातीचं सेवन करत असाल तर याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. शिळी चपाती खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरलेलं राहतं. ज्यामुळे पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. अशात तुमचं वजन कंट्रोल राहतं.
रक्तही वाढतं
शिळ्या चपातीमध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात ज्यात आयर्न, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी चा समावेश आहे. आयर्नमुळे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. कॅल्शिअमने दात आणि हाडे मजबूत होतात. हिरव्या पालेभाज्या, डाळी, दही इत्यादींसोबत शिळी चपाती खाल्ल्याने शरीराला दुप्पट शक्ती मिळते.
कशी खाल शिळी चपाती?
शिळी चपाती खाण्याआधी जर हलकी गरम करण्यात आली किंवा शेकली तर त्याची टेस्ट आणखी वाढते.
तसेच शिळ्या चपातीचे तुम्ही वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकता.
शिळी चपाती तुम्ही तुमच्या आवडीची भाजी, डाळ, दही किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता.