पोट नेहमीच फुगलेलं किंवा भरलेलं राहतं का? या तीन उपायांनी दूर होईल गॅसची समस्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:01 PM2022-06-27T12:01:48+5:302022-06-27T12:02:02+5:30
Bloating : ब्लोटिंग काय आहे? ही एक अशी समस्या आहे ज्यात तुमचं पोट नेहमीच भरलेलं जाणवतं आणि पोटात गॅस असल्याचंही जाणवतं. महिलांमध्ये ही समस्या जास्त बघायला मिळते.
Bloating : तुमचं पोट नेहमीच भरलेलं किंवा फुगलेलं राहतं का? पोट फुगलेलं राहत असल्याने तुम्ही पोटभर जेवण करू शकत नाही? थोडसंच खाल्लं की, तुमचं पोट भरतं का? जर या प्रश्नांचं उत्तर हो असेल तर याचा अर्थ तुम्हाला ब्लोटिंगच्या समस्या आहे. अर्थातच ही समस्या इतकी गंभीर नाही, पण जास्त काळ ही समस्या राहिली तर शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते आणि तुम्ही कमजोरीचे शिकार होऊ शकता. असं मानलं जातं की, ही छोटीशी समस्या इरिटेबल बाउल सिंड्रोमसारख्या गंभीर स्थितीचं कारण बनू शकते.
ब्लोटिंग काय आहे? ही एक अशी समस्या आहे ज्यात तुमचं पोट नेहमीच भरलेलं जाणवतं आणि पोटात गॅस असल्याचंही जाणवतं. महिलांमध्ये ही समस्या जास्त बघायला मिळते. असं मानलं जातं की, बद्धकोष्ठतेचं हे सर्वात मोठं कारण आहे. तसेच पोटासंबंधी अनेक समस्याही याचं कारण आहेत. जर तुम्हीही या समस्येने पीडित आहात, तर तुम्ही आहारात बदल करावा लागेल. अमेरिकन डॉक्टर Dr. Josh Axe यांनी याबाबत काही सल्ले दिले आहेत. त्यांनी सांगितलेल्या पदार्थांचा सेवन केलं तर ही समस्या दूर होऊ शकते.
पाण्याने भरपूर फळं-भाज्या
डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की, ब्लोटिंगच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी असलेला फळं आणि भाज्यांचं सेवन केलं पाहिजे. ज्यात काकडी, खरबूज, जांभळं यांचा समावेश आहे.
प्रोबायोटिक असलेले पदार्थ
डॉक्टरांनी सांगितलं की, दह्यासारखे प्रोबायोटिक खाद्य पदार्थ खराब बॅक्टेरियाला मारतात ज्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात.
जडीबुटीही फायदेशीर
त्यांनी सांगितलं की, जडीबुटीनेही पोट फुगण्याची समस्या दूर होऊ शकते. आलं, बडीशेप यांनीही पोट सहजपणे शांत होतं.
पोट फुगण्यावर उपचार
जर ही समस्या तुम्हाला खूप दिवसांपासून असेल, तर याचं मुख्य कारण बद्धकोष्ठता असू शकतं. हेच कारण आहे की, आधी बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवावी. बऱ्याच काळापासून असलेली बद्धकोष्ठतेची समस्या पाइल्सचं रूप घेऊ शकते. जर बद्धकोष्ठता हलकी असेल तर फायबरयुक्त आहार, पाणी आणि व्यायामाने मदत मिळते. पण याने फायदा होईलच असं नाही. जुन्या बद्धकोष्ठतेवर उपचार घेण्यासाठी आयबीएस किंवा गॅस्ट्रोपेरिसिससाठी मेडिकल उपचारांची गरज असते. त्यामुळे या समस्येबाबत डॉक्टरांशी बोला.