नेहमी मिठासोबतच खावेत आवळे, डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 02:31 PM2024-11-16T14:31:01+5:302024-11-16T14:59:44+5:30

How to Eat Amla : आयुर्वेदात आवळ्यात खूप महत्वं आहे. पण अनेकांना आवळा खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते.

Doctor said Amla must be consumed with salt, know the reason | नेहमी मिठासोबतच खावेत आवळे, डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण!

नेहमी मिठासोबतच खावेत आवळे, डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण!

How to Eat Amla : हिवाळ्यात बाजारात वेगवेगळी फळं येतात. यातील एक महत्वाचं फळ म्हणजे आवळा. आवळ्याला सुपरफूड मानलं जातं. हिवाळ्यात आवर्जून आवळ्याचं सेवन केलं पाहिजे. कारण याने इम्यूनिटी बूस्ट होऊन वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच आवळ्याने वजन कमी करण्यास, केस आणि त्वचेसंबंधी समस्याही दूर होतात. मात्र, अनेकजण याची चव आंबट-तुरट असल्याने याचं सेवन करत नाहीत. 

आयुर्वेदात आवळ्यात खूप महत्वं आहे. पण अनेकांना आवळा खाण्याची योग्य पद्धत माहीत नसते. आयुर्वेद Dr. Nambi Namboodiri यांनी आवळ्या खाण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. डॉक्टरांनुसार, आवळ्याचं नेहमीच मिठासोबत सेवन करावं. तसेच त्यांनी हेही सांगितलं की, लहान आवळा जास्त फायदेशीर असतो की, मोठा.
मिठासोबत खावा आवळा

आयुर्वेदात एकूण ६ रस आहेत. डॉक्टरांनुसार, आवळ्यामध्ये खारट सोडून सगळे रस असतात. त्यामुळे मिठासोबत त्याचं सेवन करावं. मिठासोबत याचं सेवन करून तो संपूर्ण बनतो आणि त्याचा आंबटपणाही बॅलन्स होतो. तसेच आवळ्यात फायदेही अधिक वाढतात.

डॉक्टरांनी सांगितलं की, आवळ्यामध्ये दोन मुख्य गुण असतात. त्याना धात्री आणि रसायनी म्हटलं जातं. धात्रीचा अर्थ आईसारखी रक्षा करणं आणि रसायनी म्हणजे पोषण देणे. म्हणजे आवळा शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव तर करतोच, सोबतच पोषणही देतो.

आवळा खाण्याची योग्य वेळ

आवळे तुम्ही रोज खाऊ शकता. यासाठी वर्ष पुरेल या हिशेबाने आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवा. आवळ्याला मीठ लावू ठेवा आणि एक आवळा रोज खा. आवळ्याचं लोणचं बनवू शकता. 

कोणते आवळे खावेत?

अनेकांना प्रश्न पडतो की, कोणत्या प्रकारचे आवळे खाण्यासाठी अधिक चांगले असतात. बाजारात दोन प्रकारचे आवळे मिळतात एक म्हणजे छोट्या आकाराचे आणि दुसरे मोठ्या आकाराचे. एक्सपर्टनुसार, गावराणी आवळे खावेत जे आकाराने लहान असतात. मोठा आकाराचे आणि स्वच्छ दिसणारे आवळे हायब्रिड असतात. ते खाऊ नये.

Web Title: Doctor said Amla must be consumed with salt, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.