मिठाचं कमी सेवनही आरोग्यासाठी ठरू शकतं घातक, शरीरातील 'हे' दोन अवयव होतील निकामी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:29 AM2024-11-11T10:29:49+5:302024-11-11T10:30:33+5:30

Low Salt Side Effects : या डॉक्टरांनुसार, सोडिअम लेव्हल कमी झाल्यावर हार्ट फेलिअर, किडनीसंबंधी आजार आणि डिमेंशियाचा धोका असतो.

Doctor says low salt diet is more dangerous it can affects heart and brain | मिठाचं कमी सेवनही आरोग्यासाठी ठरू शकतं घातक, शरीरातील 'हे' दोन अवयव होतील निकामी!

मिठाचं कमी सेवनही आरोग्यासाठी ठरू शकतं घातक, शरीरातील 'हे' दोन अवयव होतील निकामी!

Low Salt Side Effects : मीठ वेगवेगळ्या पदार्थांना देण्याचं काम तर करतंच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. हेही सगळ्यांना माहीत आहे की, मिठाचं जास्त सेवन करणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. त्याचप्रमाणे फार कमी मीठ खाणंही आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. मीठ कमी खाल्ल्याने आरोग्यासंबंधी कोणत्या समस्या होतात याबाबत एका डॉक्टरांनी माहिती दिली आहे. या डॉक्टरांनुसार, सोडिअम लेव्हल कमी झाल्यावर हार्ट फेलिअर, किडनीसंबंधी आजार आणि डिमेंशियाचा धोका असतो.

हैद्राबादच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, हेल्दी व्यक्तीने मिठाचं कमी सेवन करू नये. कारण याने डायबिटीस, कोलेस्ट्रॉल आणि इतर आरोग्यासंबंधी समस्यांचा धोका वाढतो. ते म्हणाले की, एक सामान्य धारणा आहे की, मीठ हेल्दी नसतं आणि याचं सेवन कमी करून हायपरटेंशन आणि हृदयरोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. मात्र, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सल्ला दिला आहे की, वयस्क व्यक्तींनी रोज 2000 मिलीग्रॅमपेक्षा कमी सोडिअम (जवळपास ५ ग्रॅम मीठ, एक चमच्यापेक्षा थोडं कमी)चं सेवन केलं पाहिजे.

डॉ. सुधीर कुमार यांनी हेल्दी लोकांना एक इशारा देत सांगितलं की, मीठ कमी असलेल्या पदार्थांचं सेवन करणाऱ्या लोकांमध्ये इन्सुलिन रेजिस्टेन्सचा धोका वाढतो, ज्यामुळे डायबिटीसचा धोकाही वाढतो. सोबतच मिठाच्या कमतरतेमुळे टोटल कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलची लेव्हलही वाढू शकते, जी आरोग्यासाठी नुकसानकारक असते.

सोडियम गरजेचं

डॉक्टरांनी सांगितलं की, सोडिअम पुरेसं सेवन केल्याने मेंदू, नसा आणि मसल्सच्या क्रिया व्यवस्थित होतात. कमी सोडिअम असलेल्या लोकांमध्ये कमजोरी, थकवा, चक्कर, कोमा, झटके आणि गंभीर केसेसमध्ये मृत्यूचा धोकाही असतो. तसेच काही लोकांमध्ये मिठाचं अधिक सेवन केल्याने ब्लड प्रेशरचा धोका वाढू शकतो. याला 'सॉल्ट-सेंसिटिव हायपरटेंशन'असंही म्हणतात.  ते म्हणाले की, जवळपास ५० टक्के हायपरटेंशनने पीडित लोक आणि २५ टक्के सामान्य लोकांना सॉल्ट सेन्सिटिविटी होऊ शकते. त्यांना मिठाचं सेवन कंट्रोल करण्याची गरज असते. सॉल्ट सेन्सिटिविटी जास्तकरून महिला, वृद्ध, लठ्ठ लोक आणि किडनीच्या समस्येने पीडित लोकांमध्ये आढळते.

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टरांनी सल्ला दिला की, निरोगी लोक सामान्य मिठाचं सेवन करू शकता, पण सॉल्ट-रिस्ट्रिक्टेड डाएट घेणाऱ्यांनी सोडिअमच्या कमतरतेच्या संकेतांकडे आणि लक्षणांकडे लक्ष द्यावं.
 

Web Title: Doctor says low salt diet is more dangerous it can affects heart and brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.