माधुरीचे पती डॉ. नेने यांनी सांगितला वजन कमी करण्याचा सोपा फंडा, वाचाल तर रहाल फायद्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 09:34 AM2024-10-25T09:34:56+5:302024-10-25T09:35:43+5:30
Weight Loss : डॉ. श्रीराम नेने (Dr. Sriram Nene) त्यांच्या इन्स्टावर नेहमीच आरोग्यासंबंधी वेगवेगळे सल्ले देत असतात. यातील काही व्हिडिओत त्यांनी वजनी कमी करण्याची पद्धत सांगितली आहे.
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे एक्सपर्ट वेगवेगळे सल्ले देत असतात. सोशल मीडियावर तर याबाबतचे शेकडो व्हिडीओ आहेत. कुणी घरगुती उपाय करायला सांगतात तर कुणी एक्सरसाईज. अशात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी वजन कमी करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. त्यांच्यानुसार, लाइफस्टाईलमध्ये काही बदल करूनही तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. डॉ. श्रीराम नेने (Dr. Sriram Nene) त्यांच्या इन्स्टावर नेहमीच आरोग्यासंबंधी वेगवेगळे सल्ले देत असतात. यातील काही व्हिडिओत त्यांनी वजनी कमी करण्याची पद्धत सांगितली आहे.
वजन कमी करण्याच्या टिप्स
डॉ. नेने म्हणाले की, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर यासाठी स्वत:ला उपाशी ठेवू नका. स्वत:ला उपाशी ठेवल्याने तुम्ही थकलेले असता आणि तुम्ही जास्त कार्ब्सचं सेवन करता. ज्यामुळे शुगर लेव्हल अचानक वाढते आणि इन्सुलिन स्पाइक होतं. त्यामुळे उपाशी राहू नका आणि मॉडरेशनमध्ये कार्ब्सचं सेवन करा.
जर पुन्हा पुन्हा काही खाण्याची ईच्छा होत असेल आणि तरही क्रेविंग्स रोखण्यासाठी एखाद्या दुसऱ्या गोष्टीत लक्ष घाला. काही लोक वॉक करतात, काही लोक च्युइंग गम खातात किंवा काही लोक वेगळं काही करतात.
तसेच काही लोक नाश्त्यामध्ये अशा काही गोष्टींचं सेवन करतात ज्यामुळे त्यांचं नुकसान होतात. इतकंच नाही तर त्यांचं वजनही वाढतं. अशात डॉ. नेने यांनी सांगितलं की, सकाळी नाश्त्यात व्हाईट ब्रेड, शुगरी सीरियल्स, प्रोसेस्ड मीट, स्वीटेंड योगर्ट आणि फळांचा ज्यूस यांचा समावेश करू नये. खासकरून पॅकेटमधील फळांच्या ज्यूसचं सेवन अजिबात करू नये.