हृदयासाठी कोणतं तेल ठरतं बेस्ट? डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलं उत्तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 11:09 AM2024-07-12T11:09:28+5:302024-07-12T11:10:18+5:30
Healthy Oils: अनेकांना प्रश्न पडतो की, जेवण बनवण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करावा? या प्रश्नाचं उत्तर माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी दिलं आहे.
Healthy Oils: वेगवेगळे पदार्थ किंवा जेवण बनवण्यासाठी घरांमध्ये रोज वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. तेल हे शरीरासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. अशात जर तुम्ही आरोग्याची काळजी घेण्यासाठी कितीची चांगले पदार्थ खाल्ले, पण जर तेल चांगलं नसेल तर आरोग्य बिघडल्याशिवाय राहणार नाही.
कुकिंग ऑइल जर हेल्दी नसेल तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुकिंग ऑइल चांगलं नसेल तर हृदयाचं आरोग्य धोक्यात येतं. मग अनेकांना प्रश्न पडतो की, जेवण बनवण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर करावा? या प्रश्नाचं उत्तर माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी दिलं आहे. डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) हे एक कार्डियोथोरेसिक सर्जन आहेत. त्यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर करत आरोग्यासाठी कोणतं तेल चांगलं असतं याबाबत सांगितलं आहे.
हृदयासाठी फायदेशीर तेल
राइस ब्रान ऑईल
आरोग्याचं चांगलं ठेवण्यासाठी राइस ब्रान ऑईलचं सेवन करू शकता. हे तेल अॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. याने इन्फ्लेमेशन दूर होतं आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याशिवाय या तेलाने ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. शरीरात बॅड कॉलेस्ट्रोल कमी करण्यासही हे तेल मदत करतं.
ग्राउंडनट ऑईल
हृदय निरोगी ठेवण्यासाठी खासकरून तुम्ही ग्राउंडनट ऑईलचा वापर करू शकता. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, मॉनोअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिड्स आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिड्स असतं. जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात. या तेलाच्या सेवनाने शरीरात कॉलेस्ट्रोल वाढण्याचा धोकाही कमी होतो.
मोहरीचं तेल
मोहरीच्या तेलाचा वापर भरपूर लोक करतात. या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड कमी प्रमाणात असतं. तसेच फायदेशीर मॉनोअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिड आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिड भरपूर असतं. या तेलाने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. सोबतच शरीराला यातून अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल आणि अॅंटी-बायोटिक गुणही मिळतात.
ऑलिव ऑईल
ऑलिव्ह ऑईल हे आरोग्य चांगंल ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. यात भरपूर अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. तसेच या तेलात अॅंटी-ऑक्सिडेंटही भरपूर असतात. या तेलाने शरीरात कॉलेस्ट्रोल वाढत नाही आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
तिळाचं तेल
तिळाच्या तेलामध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे शरीराचं फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणही असतात. तिळाच्या तेलामध्ये झिंक, आयर्न, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशिअमही भरपूर असतं.