डॉक्टरांनुसार पोट फुगण्याची समस्या दूर करणारं खास पाणी, जाणून घ्या कसं बनवाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 10:00 AM2024-10-02T10:00:21+5:302024-10-02T10:00:51+5:30
Stomach Health : डॉक्टरांनी एका खास होममेड ड्रिंकबाबत सांगितलं की, ज्याचं सेवन करून पोट फुगण्याची समस्या दूर होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होतं.
Stomach Health : आपल्या खाण्या-पिण्याचा थेट संबंध आपल्या पोटावर पडत असतो. आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असतो त्यानुसार आपलं मेटाबॉलिज्म प्रभावित होतं. खाण्या-पिण्यात थोडी जरी गडबड झाली तर पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. जसे की, पोट फुगणे, अॅसिडिटी, पोटदुखी आणि मळमळ होणे. जर तुम्हाला नेहमीच अशा समस्या होत असतील या समस्या दूर करण्यासाठी डॉक्टर अपराजिता लांबा एक उपाय सांगणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. डॉक्टरांनी एका खास होममेड ड्रिंकबाबत सांगितलं की, ज्याचं सेवन करून पोट फुगण्याची समस्या दूर होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. हे खास ड्रिंक तुम्ही ३ मसाल्यांच्या मदतीने तयार करू शकता.
ब्लोटिंग दूर करणारं होममेड ड्रिंक
हे ड्रिंक तयार करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे अपराजिता लांबा यांनी सांगितले आहेत. अपराजिता डर्मेटोलॉजिस्ट असून आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या टिप्स सांगत असतात.
ब्लोटिंग दूर करण्यासाठी बडीशेप, जिरे आणि ओव्याचं खास ड्रिंक बनवू शकता. हे ड्रिंक तयार करण्यासाठी ४०० ते ५०० मिलीलीटर पाणी घ्या. यात एक छोटा चमचा जिरे, बडीशेप आणि ओवा टाका. या गोष्टी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी हलक गरम करून पिऊ शकता. या पाण्याने पोट फुगण्याची समस्या दूर होईल, सोबतच याने पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. आतड्या आतून साफ होतात आणि भूकही वाढते. इतकंच नाही तर या पाण्याने पचन तंत्रही चांगलं राहतं.
या मसाल्यांचे फायदे
- बडीशेपच्या दाण्यांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सच्या होणाऱ्या नुकसानापासून वाचवततात. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि फायदेशीर अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणही असतात. त्याशिवाय बडीशेपच्या दाण्यांमुळे शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते.
- जिऱ्यामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणांसोबतच अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. तसेच यात अॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात. जिऱ्याच्या सेवनाने पचन तंत्र चांगलं राहतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
- ओव्यामध्ये फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतात. ओव्याने पोट चांगलं राहतं आणि सोबतच शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होतं.