डॉक्टरांनी पांढरे केस लगेच काळे करण्याचा सांगितला खास उपाय, घरीच 'असा' तयार करा हेअर पॅक! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 10:01 AM2024-06-03T10:01:43+5:302024-06-03T10:02:35+5:30

White hair home remedy :लोक केस काळे करण्यासाठी आणि केसांची गळती थांबवण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करतात. जे फार नुकसानकारक असतात.

Doctor suggested special to turn white hair black easily, know how to make hair pack | डॉक्टरांनी पांढरे केस लगेच काळे करण्याचा सांगितला खास उपाय, घरीच 'असा' तयार करा हेअर पॅक! 

डॉक्टरांनी पांढरे केस लगेच काळे करण्याचा सांगितला खास उपाय, घरीच 'असा' तयार करा हेअर पॅक! 

White hair home remedy : आजकाल वेगवेगळ्या कारणांमुळे कमी वयातच महिला असो वा पुरूष त्यांचे केस पांढरे होत आहेत किंवा त्यांना केसगळतीची समस्या होत आहे. अशात लोक केस काळे करण्यासाठी आणि केसांची गळती थांबवण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करतात. जे फार नुकसानकारक असतात. मात्र, असेही काही नॅचरल उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही पांढरे झालेले केस काळे, चमकदार आणि मजबूत करू शकता. आज असाच एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डॉक्टर प्रियंका त्रिवेदी (Dr.Priyanka Trivedi ) यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी पांढरे झालेले केस काळे कसे करावे याचा उपाय सांगितला आहे. त्या म्हणाल्या की, ज्या लोकांचे केस फार जास्त पांढरे झाले असतील त्यांना हा उपाय आठवड्यातून केवळ एकदा करावा. डॉक्टरांनी केस काळे करणारा एक हेअर पॅक सांगितला आहे. चला जाणून घेऊ त्यासाठी काय काय लागणार आणि तो कसा तयार कराल.

हा हेअर पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला २ चमचे आवळा पावडर, ६ चमचे हिना पावडर, १ चमचा मेथी पावडर, कलौंजी पावडर आणि कडीपत्ता पावडर इतकं साहित्य लागणार आहे.

या सगळ्या गोष्टी एक वाटीमध्ये टाका आणि चांगल्या मिक्स करा. त्यानंतर एक ग्लास पाण्यात १ चमचा चहा पावडर, कॉफी पावडर आणि १ किसलेलं बीट उकडून घ्या. जेव्हा या गोष्टी चांगल्या उकडतील तेव्हा आधी तयार केलेलं मिश्रण त्यात टाकून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट केसांवर चांगली लावा. 1 तास ही पेस्ट केसांना तशीच राहू द्या नंतर साध्या पाण्याने केस धुवून घ्या. तुम्हाला फरक लगेच दिसू लागेल. 

Web Title: Doctor suggested special to turn white hair black easily, know how to make hair pack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.