डॉक्टरांनी सांगितले पायांवर दिसतात वेगवेगळ्या आजारांचे 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:38 PM2024-09-10T12:38:02+5:302024-09-10T12:38:38+5:30

अनेकदा शरीरात एखाद्या आजाराने घर केलं आणि त्याची लक्षण दिसली तर शरीर संकेत देत असतं. पण हे ओळखता येत नाहीत. सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

Doctor tells about diseases signs on feet how to identify disease by feet | डॉक्टरांनी सांगितले पायांवर दिसतात वेगवेगळ्या आजारांचे 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध!

डॉक्टरांनी सांगितले पायांवर दिसतात वेगवेगळ्या आजारांचे 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध!

Expert Tips: सामान्यपणे शरीरात वेगवेगळ्या समस्या झाल्यावर शरीर वेगवेगळे संकेत देतं. जे अनेकांना समजत नाहीत. हे संकेत वेळीच ओळखले तर योग्य ते उपचार घेऊन समस्या वेळीच थांबवली जाऊ शकते. अनेकदा शरीरात एखाद्या आजाराने घर केलं आणि त्याची लक्षण दिसली तर शरीर संकेत देत असतं. पण हे ओळखता येत नाहीत. सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशात आज आम्ही तुम्हाला पायांवर दिसणारे वेगवेगळ्या आजारांचे संकेत काय असतात हे सांगणार आहोत.

डॉ. स्मिता भोइल पाटील यांनी याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. डॉक्टर स्मिता यांनी सांगितलं की, असे अनेक आजार असतात ज्यांचे संकेत पायांवर दिसू लागतात. फक्त वेळीच ओळखले गेले पाहिजे, जेणेकरून योग्य ते उपचार घेता येतील.

पायांवर दिसणारे आजारांचे संकेत

पायांवर सूज

जर पायांवर सूज आली असेल तर यामागे हायपरटेंशन, किडनीची समस्या, लिव्हरसंबंधी समस्या किंवा हृदयासंबंधी समस्या असू शकतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांना संपर्क करा आणि योग्य ते उपचार घ्या.

स्पायडर वींस 

काही लोकांना पायांवर जाळं लागल्यासारखे निशाण दिसतात. यांना स्पायडर वींस असं म्हणतात. यात पायांच्या नसा जाड आणि हिरव्या दिसतात. याचं कारण शरीरात हाय एस्ट्रोजन लेव्हल, बर्थ कंट्रोल पिल्स किंवा गर्भावस्था असू शकतं. असे निशाण दिसल्यावर डॉक्टरांना लगेच दाखवा.

टाचांना भेगा

पाय आणि टाचांवर भेगा पडण्याचं कारण व्हिटॅमिन बी 2 म्हणजे रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी3 म्हणजे नियासिनेमाइडमुळे होतं. यामुळे ओमेगा 3 अॅसिडही कमी होतं. अशात तुमच्या आहारात व्हिटॅमिन आणि ओमेगा 3 अॅसिडचा समावेश करावा. याने आरोग्यासोबतच त्वचेलाही फायदा मिळतो.

पायांमध्ये झिणझिण्या

जर तुम्हाला नेहमीच पायांमध्ये झिणझिण्या येत असेल किंवा पाय सुन्न होत असतील तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाली आहे. यासाठी आहारात बदल करा किंवा व्हिटॅमिन बी 12 चे सप्लीमेंट्स घ्या.

पाय थंड पडणे

शरीरात आयोडिन कमी असेल किंवा एनीमियामुळे ही समस्या होते. या गोष्टीची काळजी घ्या की, तुम्ही पुरेसं आयोडिन घ्याल आणि तसे एनीमियाची समस्याही दूर कराल.

क्रॅम्प्स किंवा स्पाज्म

पायांच्या मसल्समध्ये अचानक तणाव, वेदना जाणवत असेल तर हे शरीरात मॅग्नेशिअम कमी असल्याचं लक्षण असू शकतं. ही कमतरता भरून काढण्यासाठी मॅग्नेशिअम असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा. 

Web Title: Doctor tells about diseases signs on feet how to identify disease by feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.