केळींचा रोजच्या आहारात का करावा समावेश? डॉक्टरांनी सांगितली काही खास कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 03:34 PM2024-09-02T15:34:49+5:302024-09-02T15:36:03+5:30

Banana eating Benefits : एम्सच्या डॉक्टर प्रियांका सहरावत यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की, रोजच्या आहारात केळीचा समावेश का करायला हवा. 

Doctor tells amazing health benefits of eating banana daily | केळींचा रोजच्या आहारात का करावा समावेश? डॉक्टरांनी सांगितली काही खास कारणं...

केळींचा रोजच्या आहारात का करावा समावेश? डॉक्टरांनी सांगितली काही खास कारणं...

Banana eating Benefits : आपण रोज आहार कसा घेतो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. म्हणजे आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर प्रभाव पडतो. अशात आपला रोजचा आहार हा पौष्टिक असला पाहिजे. त्यात हिरव्या पालेभाज्या, फळं, कडधान्यांचा समावेश असला पाहिजे. अनेक एक्सपर्ट डाएटमध्ये केळीचा समावेश करण्याचा सल्ला देत असतात. एम्सच्या डॉक्टर प्रियांका सहरावत यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की, रोजच्या आहारात केळीचा समावेश का करायला हवा. 

केळी खाण्याचे फायदे

डॉ. प्रियांका यांनी सांगितलं की, रोज एक केळी खाल्ल्याने तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची पाळीच येणार नाही किंवा असं म्हणुया की, तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता. केळ हे एक चांगलं प्रीबायोटिक फूड आहे. प्रीबायोटिक आपल्या गट हेल्थसाठी म्हणजे आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं.

तसेच केळीमध्ये पोटॅशिअमही भरपूर प्रमाणात असतं. पोटॅशिअमने मसल्स चांगले राहतात. इतकंच नाही तर मसल्समध्ये होणाऱ्या झिणझिण्या सुद्धा याने दूर होण्यास मदत मिळते. पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम किंवा व्हिटॅमिन डी शरीरात कमी झाल्याने मसल्समध्ये झिणझिण्या येतात. अशात केळी खाऊन ही समस्या तुम्ही दूर करू शकता. तसेच केळीमध्ये सोडिअम जास्त नसतं ज्यामुळे बीपी आणि हाय शुगरचे रूग्ण देखील केळी सहजपणे खाऊ शकतात.

केळी खाऊन वजन वाढतं?

डॉक्टर प्रियांचा सहरावत यांनी सांगितलं की, केळी खाल्ल्याने वजन वाढत नाही. तुम्ही दिवसभरातून १ ते २ केळी सहजपणे खाऊ शकता. केळीमध्ये फायबर भरपूर असतं. या सगळ्या कारणांमुळे रोज केळीचं सेवन केलं पाहिजे. जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. 
 

Web Title: Doctor tells amazing health benefits of eating banana daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.