नेहमीच गॅसमुळे पोट फुगलेलं राहतं? डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' उपायाने लगेच मिळेल आराम...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 11:37 AM2024-08-05T11:37:18+5:302024-08-05T11:58:29+5:30

Gas Problem Home Remedies : गॅसची समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतात. पण आज आम्ही तुम्हाला यावर एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. 

Doctor tells an effective home remedy to remove gas problem | नेहमीच गॅसमुळे पोट फुगलेलं राहतं? डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' उपायाने लगेच मिळेल आराम...

नेहमीच गॅसमुळे पोट फुगलेलं राहतं? डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' उपायाने लगेच मिळेल आराम...

Gas Problem Home Remedies : जास्तीत जास्त लोकांना वेगवेगळ्या कारणाने गॅसची समस्या नेहमीच होत असते. पोटात गॅस झाला की, कशातच मन लागत नाही. सतत अस्वस्थ वाटत राहतं. पोट फुगतं मग अजूनच वैताग येतो. ही समस्या होण्यामागे चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, जास्त वेळ उपाशी राहणे, जास्त तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे आणि रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे या कारणांमुळे होते. गॅसची समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतात. पण आज आम्ही तुम्हाला यावर एक सोपा उपाय सांगणार आहोत. 

डॉक्टर इरफान यांनी गॅसची समस्या दूर करणारा एक उपाय सांगितला आहे. त्यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे. डॉक्टर इरफान यांच्यानुसार, पोटात जेव्हा गॅस तयार होतो तेव्हा फार अस्वस्थ वाटू लागतं. जर गॅस छातीत शिरला तर छातीत दाटलेपणा येतो आणि अस्वस्थ वाटतं. गॅसमुळे छातीत वेदना होता आणि जळजळही होते. लोक गॅसची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळी औषधं घेतात. पण याने नुकसान होऊ शकतं. अशात एक घरगुती उपाय करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

गॅस दूर करणारा घरगुती उपाय

अमोनिअम क्लोराइड म्हणजे नवसागरचं सेवन करून तुम्ही गॅसची समस्या लगेच दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला चिमुटभर नवसागर एक ग्लास पाण्यात मिक्स करून सेवन करावं लागेल. रात्रीच्या जेवणानंतर साधारण १५ मिनिटांनी तुम्ही याचं सेवन करा. जर तुम्हाला अपचन आणि बद्धकोष्ठता अशाही समस्या असेल तर चिमुटभर नवसागर पाण्यात मिक्स करा व त्यातं थोडा लिंबाचा रस टाकून प्या. याने तुमच्या समस्या दूर होतील. जर तुम्हाला गॅसची समस्या जास्त नसेल किंवा कधी कधीच होत असेल तर नवसागर आणि पाण्यात लिंबाचा रस टाकू नका.

पोटात कसा तयार होतो गॅस? 

पोटात गॅस तयार होणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. सगळ्यांच्याच पोटात गॅस तयार होतो. काही प्रमाणात हा गरजेचाही असतो. पण जेव्हा ही समस्या वाढत असेल आणि सतत गॅस होत असेल तर वेळीच सावध व्हायला पाहिजे. पोटात गॅस तयार होण्याची वेगवेगळी कारणे असतात. जसे की, जेवण करताना आपण थोड्या प्रमाणात हवाही गिळतो, जी आपल्या पचन तंत्रात तोपर्यंत राहते जोपर्यंत आपण गॅस पास करत नाही. कार्बोहायड्रेट डाएट आणि ड्रिंकही गॅसचं कारण ठरतात.

जेवताना करू नका ही चूक

जास्तीत जास्त लोक जेवण करताना काही चुका करतात. बरेच लोक जेवण करत असताना मधे मधे पाणी पितात. असं केल्याने पोटातील अन्न व्यवस्थित पचन होत नाही, ज्यामुळे पोटात गॅस तयार होता. तसेच बरेच लोक घाईघाईने खातात असंही करणं चुकीचं आहे. 

Web Title: Doctor tells an effective home remedy to remove gas problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.