काही दिवसात लिव्हरची आतून होईल सफाई, डॉक्टरांनी सांगितले काही नॅचरल उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 03:28 PM2024-10-04T15:28:01+5:302024-10-04T15:28:45+5:30

Natural Liver Detox Tips : तसं तर लिव्हर त्यात जमा झालेले विषारी पदार्थ स्वत:च साफ करतं. पण फार जास्त विषारी पदार्थ किंवा फॅट जमा झालं तर वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.

Doctor tells how to detox liver naturally at home | काही दिवसात लिव्हरची आतून होईल सफाई, डॉक्टरांनी सांगितले काही नॅचरल उपाय!

काही दिवसात लिव्हरची आतून होईल सफाई, डॉक्टरांनी सांगितले काही नॅचरल उपाय!

Natural Liver Detox Tips : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अधिक मद्यसेवन यामुळे लिव्हरचं फार जास्त नुकसान होतं. लिव्हर हे शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतं. त्यामुळे त्याला इजा होईल अशा गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण लिव्हरमध्ये काही गडबड झाली तर शरीरावर याचा गंभीर प्रभाव पडतो. लिव्हर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि ग्लूकोज स्टोर करतं. या गोष्टी शरीराला एनर्जी देत असतात. तसेच लिव्हरद्वारे प्रोटीन, गुड कोलेस्ट्रॉल आणि वेगवेगळ्या हार्मोन्सची निर्मितीही करतं. 

तसं तर लिव्हर त्यात जमा झालेले विषारी पदार्थ स्वत:च साफ करतं. पण फार जास्त विषारी पदार्थ किंवा फॅट जमा झालं तर वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. लिव्हरमध्ये जास्त विषारी पदार्थ जमा झाले तर लिव्हर डॅमेजचाही धोका असतो. अशात साओलचे डॉक्टर विमल छाजेड यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून नॅचरल पद्धतीने लिव्हर कसं डिटॉक्स करता येईल याबाबत सांगितलं.

हळद

एनसीबीआयनुसार, हळद एक असं सुपरफूड आहे ज्याने इन्यूनिटी मजबूत होते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. यात अॅंटी-इन्फ्लेमेशन, अॅंटी-ऑक्सिडेंट आणि करक्यूमिन असतं. हळदीचं सेवन करणं लिव्हरसाठी खूप फायदेशीर असतं. जर तुम्ही रोज हळदीचं पाणी पित असाल तर लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर पडतात. याने लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यास मदत मिळते.

मिल्क थिसल

मिल्क थिसल ही एक फार गुणकाही वनस्पती आहे. हे एक असं फळ आहे जे लिव्हरसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. मिल्क थिसल सिरोसिस किंवा क्रॉनिक हेपेटायटिस असलेल्या लोकांसाठी रामबाण उपाय ठरतं. कोमट पाण्यात २ चमचे मिल्क थिसल पावडर टाकून प्यायल्याने लिव्हर डिटॉक्स होतं.

धण्याचं पाणी

लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही धण्याच्या पाण्याचं देखील सेवन करू शकता. यात व्हिटॅमिन सी आणि फोलिक अॅसिड असतं. तसेच धण्याच्या पाण्यात फायबरही असतं जे लिव्हर निरोगी ठेवतं. रोज सकाळी रिकाम्या पोटी धण्याचं पाणी प्यायल्याने शरीरात गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं. तसेच लिव्हरही डिटॉक्स होतं.

ग्लूकोज पाणी

जर तुम्हाला लिव्हरसंबंधी काही समस्या असेल तर तुम्ही ग्लूकोज पाणीही पिऊ शकता. याने तुमचं शरीर हायड्रेट राहील आणि पचनशक्तीही मजबूत होईल. मात्र, ग्लूकोज पाण्याचं जास्तही सेवन करू नये. याने लिव्हरचं नुकसानही होऊ शकतं. ग्लूकोज फॅटच्या रूपात लिव्हरमध्ये जमा होऊ शकतं, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते.

लिव्हर कसं निरोगी ठेवाल?

पौष्टिक आहार आणि नियमितपणे व्यायाम केला तर तुम्ही लिव्हर हेल्दी ठेवू शकता. तसेच शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. हेल्दी स्नॅक्स, फळं, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. तसेच जास्त मद्यसेवन आणि कॅफीनचं सेवन करू नका. याने लिव्हर डॅमेज होऊ शकतं.

Web Title: Doctor tells how to detox liver naturally at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.