डॉक्टरांनी सांगितलं दिवाळीला फटाक्याने त्वचा भाजल्यावर काय करावं आणि काय करू नये!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 12:28 PM2024-10-31T12:28:23+5:302024-10-31T12:36:23+5:30
Diwali 2024: डॉक्टर अग्नि कुमार बोस यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे. यात त्यांनी फटाक्याने त्वचा भाजली तर काय करावे हे सांगितलं आहे.
Diwali 2024: दिवाळी हा रोषणाईचा उत्सव आहे. सगळीकडे दिव्यांचा प्रकाश बघायला मिळतो. दिवाळीचा लोक फटाके फोडून उत्सव साजरा करतात. पण अनेकदा फटाक्यांनी अनेकांच्या हात-पायांना किंवा डोळ्यांना इजा होते. अशात अनेकांना हे माहीत नसतं की, लगेच काय उपचार करावे. भाजलेल्या भागावर काय लावावं, पाण्यात बुडवावं की पट्टी बांधावी याबाबत लोक कन्फ्यूज असतात. भाजलेल्या जागेवर वेळीच उपचार केले गेले नाही तर त्वचेवर डागही पडू शकतात. अशात डॉक्टर अग्नि कुमार बोस यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे. यात त्यांनी फटाक्याने त्वचा भाजली तर काय करावे हे सांगितलं आहे.
डॉ. अग्नि कुमार बोस म्हणाले की, जर दिवाळीत फटाक्यांमुळे त्वचा भाजली गेली असेल तर सगळ्यात आधी भाजलेली त्वचा थंड वाहत्या पाण्याखाली धरा किंवा ग्लासच्या मदतीने थंड पाणी त्वचेवर टाका. कधीही भाजलेल्या त्वचेवर थेट बर्फ लावू नये. कारण याने फायद्यापेक्षा नुकसान जास्त होईल. बर्फ भाजलेल्या त्वचेवर थेट लावला तर याने आइस बर्नची समस्या होऊ शकते आणि त्वचा आणखी जळू शकते.
नंतर भाजलेल्या त्वचेवर प्लेन अॅंटी-बाायोटिक क्रीम लावा आणि वरून पट्टी लावून टेपने बांधून घ्या. कधीही रूई थेट भाजलेल्या भागावर लावू नये. कारण रूईमधील फायबर जखमेवर चिकटल्याने जखम आणखी वाढू शकते. त्याशिवाय जेव्हा ड्रेसिंग चेंज कराल तेव्हा जखमेवर चिकटलेल्या रूईने समस्या आणखी वाढेल.
काही दिवसांनी भाजलेल्या त्वचेवर फोडही येऊ शकतो. जी सामान्य बाब आहे. यावर नियमितपणे ड्रेसिंग करत रहा. जर ड्रेसिंग आंघोळ करताना भिजलं तर समस्या वाढू शकते. अशात आंघोळ केल्यावर ड्रेसिंग चेंज करा.