पोटाच्या एक नाही अनेक समस्या दूर करणारा आयुर्वेदिक उपाय, डॉक्टरांनी सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 09:32 AM2024-07-25T09:32:09+5:302024-07-25T09:37:14+5:30

Triphala health benefits : डॉ. मधुसुदान यांनी याचे फायदे सांगणारा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. चला जाणून घेऊ त्रिफळ्याचे फायदे...

Doctor tells how trifala will help to solve stomach problem | पोटाच्या एक नाही अनेक समस्या दूर करणारा आयुर्वेदिक उपाय, डॉक्टरांनी सांगितले फायदे

पोटाच्या एक नाही अनेक समस्या दूर करणारा आयुर्वेदिक उपाय, डॉक्टरांनी सांगितले फायदे

Triphala health benefits :  त्रिफळा हा शब्द तुम्ही नेहमीच ऐकला असेल. त्रिफळा हे एक फळ नाहीये तर हे आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन औषधी वनस्पतींच्या फळांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण केलेले चूर्ण होय. याला आयुर्वेदात फार महत्व आहे. त्रिफळामध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. तसेच यात व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने इम्यूनिटीही बूस्ट होते. तसेच त्रिफळ्याचं सेवन करून शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. डॉ. मधुसुदान यांनी याचे फायदे सांगणारा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. चला जाणून घेऊ त्रिफळ्याचे फायदे...

त्रिफळाचे फायदे

डॉक्टर मधुसुदान यांनी सांगितलं की, एका मातीच्या भांड्यात एक ग्लास पाण्यात एक चमचा त्रिफळाचं पाणी टाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून त्यात लिंबू पाणी टाकून सेवन करा. यात तुम्ही 2 ते 4 चमचे मधही टाकू शकता. सकाळी रिकाम्या पोटी याचं सेवन केल्याने पचन चांगलं होतं आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. तसचे याने वजन कमी करण्यास मदत, भूक वाढते आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं.

त्रिफळाचे इतरही फायदे

- त्रिफळाचं नियमित सेवन कराल तर हृदयारोगाचा धोका कमी होतो.

- त्रिफळाचं पावडर दुधात टाकून सेवन केलं तर बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

- त्रिफळाचं पावडर गरम पाण्यात टाकून सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या लगेच दूर होतात.

- त्रिफळा पावडर खोबऱ्याच्या तेलात मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता. याने त्वचा चांगली होते आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. 

- केसगळती थांबवण्यासाठी त्रिफळ्याचं सेवन करू शकता. याने केसगळती तर थांबतेच सोबतच केस मजबूत होतात आणि चमकदारही होतात.

Web Title: Doctor tells how trifala will help to solve stomach problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.