लहान मुलांमधील फोनची सवय कशी मोडाल? डॉक्टरांनी सांगितल्या काही टिप्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 11:10 AM2024-09-03T11:10:59+5:302024-09-03T11:11:32+5:30
Phone Guidelines for kids : डॉक्टर बंसल यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की, 0 ते 2 वर्षाच्या मुलांनी अजिबात फोन बघू नये. इतकंच काय तर त्यांना टीव्ही सुद्धा बघू देऊ नये.
Phone Guidelines for kids : लहान मुले फोनवर काय बघतात हे पूर्णपणे त्यांच्या पालकांवर अवलंबून असतं. मुलांची फोनची सवय मोडायची असेल तर आधी पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याबाबत डॉक्टर बंसल यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत. ज्यात त्यांनी वयानुसार मुलांनी काय बघावं आणि काय बघू नये याबाबत माहिती दिली आहे.
मुलांसाठी फोनची गाइडलाईन
डॉक्टर बंसल यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की, 0 ते 2 वर्षाच्या मुलांनी अजिबात फोन बघू नये. इतकंच काय तर त्यांना टीव्ही सुद्धा बघू देऊ नये. तेच 2 ते 5 वयोगटातील मुलांनी अर्धा ते 1 तास टीव्ही किंवा फोन बघणं ठीक आहे. यादरम्यान हेही बघा की, ते काय बघत आहेत. त्यांना काही शिकता येईल अशा कंटेंटवर भर दिला पाहिजे. त्याशिवाय 5 वयाच्या वरच्या मुलांना फोन आणि टीव्हीपासून दूर ठेवलं पाहिजे.
फोनची सवय कशी मोडाल?
काही गोष्टी ठरवा
फोनची सवय मोडण्यासाठी सगळ्यात आधी स्क्रीन टाईम फिक्स करा. कधी आणि कुठे फोन बघावा हे ठरवा. उदाहरण म्हणजे जेवण करताना किंवा झोपताना फोनचा वापर रोखा. मुलांनी किती वेळ फोन बघावा याची वेळ तुम्ही फिक्स केली पाहिजे.
बाहेर खेळणं वाढवा
मुलांना वेगवेगळ्या अॅक्टिविटी करण्यास भाग पाडा. ज्यात फोनचा वापर नसेल. यात बाहेर खेळणं, वाचणं, चित्र काढणं, कुटुंबातील लोकांसोबत खेळ खेळणं यांचा समावेश असू शकतो.
तुम्हीही त्यांच्यासोबत खेळा
पालकांना फोन बघताना पाहून लहान मुलेही फोन बघतात. त्यामुळे मुलांसमोर फोन वापरणं टाळा. त्यांच्यासोबत असे काही खेळ खेळा ज्यात फोना वापर नसेल. याने त्यांना चांगल्या सवयी लागतील.