केसगळतीबाबत डॉक्टरांनी सांगितल्या महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या केसगळतीची कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 13:11 IST2024-06-13T13:11:02+5:302024-06-13T13:11:57+5:30
Hair fall Reason : बरेच लोक केसगळती होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी दुर्लक्ष करतात. मुळात केसगळतीचं मुख्य कारण जर माहीत असेल तर तुम्ही योग्य उपचार घेऊ शकता.

केसगळतीबाबत डॉक्टरांनी सांगितल्या महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या केसगळतीची कारणे
Hair fall Reason : महिला असो वा पुरूष केसगळती एक गंभीर समस्या बनत चालली आहे. कमी वयात लोकांचे केस गळू लागतात. अशात जर वेळीच केसगळतीची समस्या दूर करण्याचे प्रयत्न केले नाही तर टक्कलही पडू शकतं. केसगळती होणारे लोक वेगवेगळे घरगुती उपाय करायला सुरूवात करतात किंवा वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करतात. तर कुणी त्यांचा शाम्पू बदलतात. वेगवेगळ्या तेलांनी मालिश करतात.
पण बरेच लोक केसगळती होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी दुर्लक्ष करतात. मुळात केसगळतीचं मुख्य कारण जर माहीत असेल तर तुम्ही योग्य उपचार घेऊ शकता. डर्मेटोलॉजिस्ट नीरा नाथन यांनी सांगितलं की, अशी काही लक्षण आणि चुका असतात ज्या वेळीच जाणून घेणं गरजेचं असतं.
डर्मेटोलॉजिस्ट नीरा नाथन यांनी सांगितलं की, केसगळतीच्या कारणांचा वेळीच शोध घेतला तर तुम्ही लगेच आणि योग्य ते उपाय करू शकाल. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे तुमच्या केसांमध्ये कोंडा नसेल तर अॅंटी-डॅंड्रफ शाम्पूचा वापर करू नका. तिसरी मुद्दा म्हणजे लो व्हिटॅमिन डी लेव्हलकडे दुर्लक्ष करू नका. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचा थेट केसगळतीशी संबंध असतो.
केसगळतीची कारणे
केसगळती होण्याची अनेक कारणे आहेत. कधी कधी तुम्ही आजारी पडल्यानंतरही केस गळतात. वेळेआधीच केस गळणे म्हणजे तुम्हाला काहीतरी समस्या आहे. असंतुलित डाएट हेही याचं एक कारण असू शकतं. किंवा एखाद्या आजाराच्या काही काळापासून सुरु असलेल्या उपचारामुळेही केस गळती होते. तसेच एखाद्या प्रकारचा मानसिक आघातामुळेही केस गळण्याची समस्या होते. रक्त संचार कमी झाल्यानेही केस गळतात. डायबेटिजने ग्रस्त असलेल्या रुग्णांनाही केस गळतीची समस्या होऊ शकते. केसांची योग्य काळजी न घेणे, स्वच्छता न ठेवणे, केसात कोंडा होणे यामुळेही केस गळतात.
केस धुतांना काय काळजी घ्यावी?
केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा आणि आठवड्यातून कमीत कमी २ ते ४ वेळा तेलाने मालिश करा. केस धुतल्यानंतर कंडीशनर जरूर लावा.
काय करू नये?
चांगलं वाटत असलं तरी केस धुण्यासाठी फार गरम पाण्याचा वापर करू नये. याने केस अधिक कमजोर होतात. सोबतच केस कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करू नका. याने केसांवर दबाव पडतो आणि केस तुटतात.