व्हाईट की ब्राउन ब्रेड? डॉक्टरांकडून जाणून घ्या काय जास्त फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:47 AM2024-07-16T11:47:46+5:302024-07-16T11:49:12+5:30

White bread or brown bread : डॉक्टर मनन वोरा आणि डायटिशिअन भावेश गुप्ता यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी दोन्ही ब्रेडमध्ये काय फरक आहे हे सांगितलं आहे.

Doctor tells white bread or brown bread which is healthier | व्हाईट की ब्राउन ब्रेड? डॉक्टरांकडून जाणून घ्या काय जास्त फायदेशीर!

व्हाईट की ब्राउन ब्रेड? डॉक्टरांकडून जाणून घ्या काय जास्त फायदेशीर!

White bread or brown bread  :  भारतात जास्तीत जास्त लोक ब्रेडचं सेवन सकाळी चहासोबत भरपूर करतात. तसेच वेगवेगळ्या पद्धतीनेही याचं सेवन केलं जातं. सकाळच्या नाश्त्यामध्ये तर ब्रेड भरपूर असतो. बाजारात व्हाईट ब्रेड आणि ब्राउन ब्रेड असे दोन्ही ब्रेड मिळतात. पण अनेकांना प्रश्न पडतो की, व्हाईट ब्रेड चांगला की ब्राउन ब्रेड चांगला? कारण ब्रेडमुळे वजन वाढतं असं मानलं जातं. अशात याबाबत डॉक्टरांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्या तुमची ही समस्या दूर करण्यासाठी महत्वाच्या ठरू शकतात. डॉक्टर मनन वोरा आणि डायटिशिअन भावेश गुप्ता यांनी याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी दोन्ही ब्रेडमध्ये काय फरक आहे हे सांगितलं आहे.

डॉक्टरांनुसार, व्हाईट ब्रेड आणि ब्राउन ब्रेडमध्ये कॅलरीचा फार फरक नसतो. व्हाईट ब्रेडमध्ये ७० ते ८० कॅलरी असतात आणि ब्राउन ब्रेडमध्ये ८० ते ९० कॅलरी असतात. या दोन्ही ब्रेडमध्ये न्यूट्रिएंट्सचा फरक असतो. व्हाईट ब्रेड जास्त प्रोसेस्ड ब्रेड असतो. व्हाईट ब्रेडमध्ये एंडोस्पर्म असतं जे ज्यात जास्त स्टार्च असतो आणि त्यामुळे यात कमी पोषक तत्व असतात.

होल व्हीट ब्रेड आणि मल्टी ग्रेन ब्रेडमध्ये जर्म आणि ब्रान असतात जे प्रोसेसिंगच्या वेळी सुद्धा जसेच्या तशेच राहतात. त्यामुळे यात जास्त पोषक तत्व असतात.
ब्रेडमध्ये एडिटिव्स आणि फिलर्स मिक्स केल्याने दोन्ही ब्रेडमध्ये काही फरक राहत नाही. सोबतच टेस्ट चांगली करण्यासाठी बऱ्याच ब्रेडमध्ये अ‍ॅडेड शुगर जसे की, कॉर्न स्टार्च आणि फ्रुक्टोस कॉर्न सिरप टाकलं जातं. अशात जर हेल्दी ब्रेडला तुम्हाला पर्याय हवा असेल तर ब्रेड ऐवजी तुम्ही घरी बनलेली चपाती खाऊ शकता.

डॉक्टर सांगतात की, तुम्ही ब्रेड खरेदी करताना पॅकेट पाहिलं पाहिजे. त्यात मॉल्ट आणि कॅरेमल कुठेच लिहिलेलं नसतं. कारण या गोष्टी प्रोसेसिंगमध्ये वापरल्या जातात. ज्यामुळे ब्रेड जास्त ब्राउन दिसतो. सोबतच होल व्हीट फ्लारचं कंटेंट बघा, रंगाच्या आधारावर ब्रेड निवडण्याआधी ज्या ब्रेडमध्ये जास्त पोषक तत्व आहेत ते निवडा.

Web Title: Doctor tells white bread or brown bread which is healthier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.