पाइल्सची समस्या दूर करणारा सोपा आयुर्वेदिक उपाय, जाणून घ्या कसा कराल वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 11:16 AM2024-11-19T11:16:58+5:302024-11-19T11:25:09+5:30

Piles Ayurvedic Remedies : आपल्याच काही चुकांमुळे ही समस्या होते. ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, सर्जरी करण्याची वेळ येते.

Doctor told a effective home remedies to treat piles or bawasir at home | पाइल्सची समस्या दूर करणारा सोपा आयुर्वेदिक उपाय, जाणून घ्या कसा कराल वापर!

पाइल्सची समस्या दूर करणारा सोपा आयुर्वेदिक उपाय, जाणून घ्या कसा कराल वापर!

Piles Ayurvedic Remedies :  चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल बऱ्याच लोकांना मूळव्याधीची समस्या होते. एकदा का ही समस्या झाली तर व्यक्तीचं उठणं आणि बसणं दोन्हीही मुश्कील होऊन बसतं. मूळव्याध झाल्यावर गुदद्वारात असह्य वेदना होतात. आपल्याच काही चुकांमुळे ही समस्या होते. ही समस्या कधी कधी इतकी वाढते की, सर्जरी करण्याची वेळ येते. अशात आज आम्ही तुम्हाला मूळव्याध दूर करण्याचा एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत. 

आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करून मूळव्याध दूर करण्याचा, कोंब गाळून पाडण्याचा एक सोपा आणि आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे. हा उपाय तुम्ही घरीच सहजपणे करू शकता.

डॉ. विलास शिंदे यांनी सांगितलं की, "कडूलिंबाचं फळ म्हणजे लिंबोळ्या मूळव्याध दूर करण्यासाठी फार फायदेशीर असतात. लिंबोळ्याचा एक खास मलम तयार करून लावला तर मूळव्याधामुळे आलेला कोंबही गळून पडतो आणि मूळव्याध बरा होतो. यासाठी मूठभर लिंबोळ्या घ्याच्या आणि त्यातील गर काढायचा. हा गर खोबऱ्याच्या तेलात टाकून गॅसवर चांगला परतवून घ्या. तो लालसर झाला असेल त्यानंतर मलम गाळून घ्या. काही दिवस सकाळी संध्याकाळ हा मलम लावा. याने मूळव्याधाचा कोंब गळून पडेल आणि तुम्हाला आराम मिळेल".

पाइल्स होण्याची कारणं

पाइल्स वाढण्याचं कारण बदलती लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यात झालेले बदल हे आहेत. आजकाल फळं खाण्याऐवजी त्यांचा ज्यूस घेतला जातो. यात फायबर नसतं. पण आपल्या मोठ्या आतडीमध्ये केवळ फायबर आणि पाणी जातं. फास्ट फूडच्या चलनामुळे आणि फिजिकल अॅक्टिविटी कमी झाल्याने लोक पाणीही कमी पितात. यामुळे लोक पाइल्सचे शिकार होतात.

- बद्धकोष्ठता

- जास्त तिखट, तेलकट तसंच बाहेरचे पदार्थ जास्त खाणे

- जास्त मांसाहार, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू सेवन

- एका जागी बसून तासंतास काम करणे

- सतत जास्त जागरण करणे

- जेवणाच्या आणि कामाच्या अनियमित वेळा

- कोरडे आणि शिळे अन्न खाणे

- अनुवांशिक

Web Title: Doctor told a effective home remedies to treat piles or bawasir at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.