लिव्हरमधील विषारी पदार्थ निघतील बाहेर, होईल मजबूत; फक्त फॉलो करा सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:26 AM2023-05-29T11:26:35+5:302023-05-29T11:27:22+5:30

अनहेल्दी डाएट, मद्यसेवन आणि जेनेटिक कारणांमुळे लिव्हरचे आजार होऊ शकतात. निरोगी जीवनशैली अवलंबून लिव्हरच्या समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते.

Doctor told easy ways to make liver healthy and fit naturally | लिव्हरमधील विषारी पदार्थ निघतील बाहेर, होईल मजबूत; फक्त फॉलो करा सोप्या टिप्स!

लिव्हरमधील विषारी पदार्थ निघतील बाहेर, होईल मजबूत; फक्त फॉलो करा सोप्या टिप्स!

googlenewsNext

लिव्हरला शरीरात वेगवेगळी कामे करावी लागतात. शरीरातील रसायने आणि अन्न पचनापासून ते अपशिष्ट पदार्थ बाहेर काढणे व छोट्या आतड्यांमधील फॅट तोडण्यासाठी पित्ताचं उत्पादन करणे अशी कामे लिव्हरला करावी लागतात. त्याशिवाय कोलेस्ट्रॉल निर्माण करणे, आयरनचा भांडार करणे आणि रक्ताच्या गाठींना रेग्युलेट करणे अशीही कामे आहेत. 

डॉक्टर सांगतात की, अनहेल्दी डाएट, मद्यसेवन आणि जेनेटिक कारणांमुळे लिव्हरचे आजार होऊ शकतात. निरोगी जीवनशैली अवलंबून लिव्हरच्या समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते. जर तुमच्या घरात कुणी लिव्हरचा रूग्ण असेल तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, काळजी घेण्यासाठी डेली रूटीन कसं असावं. सकाळापासून रात्रीपर्यंत कोणती कोणती कामे केल्याने आणि न केल्याने लिव्हर नॅच्युरली हेल्दी आणि फिट राहण्यास मदत मिळू शकते.

लिव्हर कसं ठीक करावं?

1) तुम्ही दिवसाची सुरूवात एक ग्लास कोमट पाणी आणि लिंबाने करावी. याने लिव्हर उत्तेजित राहतं.

2) हेल्दी ब्रेकफास्ट करा ज्याज बेरीज, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्य यांचा समावेश असेल.

3) प्रोसेस्ड आणि फॅट असलेले फूड खाणं टाळा, याने लिव्हरवर दबाव पडतो.

4) स्ट्रेचिंग किंवा वॉकिंगसारखी हलकी एक्सरसाइज करा. याने ब्लड फ्लो सुधारतो.

लिव्हर मजबूत करा

सगळीच देण्यात आलेली औषधे घ्या आणि दिवसभर भरपूर पाणी प्या. तसेच हेल्दी स्नॅक्स जसे की, फळं, भाज्या, नट्स आणि सीड्सचं सेवन करा. जास्त मद्यसेवन आणि कॅफीन टाळा. कारण हे पदार्थसाठी घातक ठरू शकतात.

लिव्हर निरोगी ठेवा

1) तणाव कमी करण्यासाठी मोठा श्वास घ्या किंवा मेडिटेशन करा. 

2) एकाचवेळी जास्त खाणं टाळा. कारण जास्त खाल्ल्याने लिव्हरवर दबाव पडू शकतो. 

3) एका जागी बसून काम करत असाल तर छोटे छोटे ब्रेक घ्या. जास्त वेळ एका जागी बसून राहिल्याने लिव्हरवर दबाव पडू शकतो. 

4) जड आणि तळलेले पदार्थ टाळा. रात्री आरामदायक झोपेसाठी रूममध्ये अंधार, शांत आणि तापमान सेट करा. रात्री उशीरा काही खाणं टाळा. 

Web Title: Doctor told easy ways to make liver healthy and fit naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.