लिव्हर निरोगी ठेवण्याचे रामबाण उपाय, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं काय करावं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:53 AM2024-07-10T11:53:40+5:302024-07-10T11:54:28+5:30

लिव्हर चांगलं ठेवणं ही आपली जबाबदारी असते. त्यासाठी काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. त्या काय आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Doctor told include these 6 home remedies to reduce fatty liver and to detox at home | लिव्हर निरोगी ठेवण्याचे रामबाण उपाय, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं काय करावं!

लिव्हर निरोगी ठेवण्याचे रामबाण उपाय, डॉक्टरांनी सांगितलं नेमकं काय करावं!

लिव्हर शरीरातील सगळ्यात मोठं आणि महत्वाचं अवयव आहे. लिव्हर शरीरातील अनेक कामात महत्वाची भूमिका बजावतं. पण आपल्याच काही चुकांमुळे लिव्हर खराब होतं. या चुकांबाबत लोकांना माहीत नसतं. वेळ निघून गेली की नंतर लिव्हर ट्रांसप्लांटची वेळ येते. अशात लिव्हर चांगलं ठेवणं ही आपली जबाबदारी असते. त्यासाठी काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. त्या काय आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लिव्हर खराब होण्याच कारणं

दारूचं जास्त सेवन केल्याने लिव्हर जास्त खराब होतं असं सगळ्यांना वाटतं. हे एक कारण आहेच. पण असं अजिबात नाही की, फक्त दारू पिऊन लिव्हर खराब होतं. दारू न पिताही लिव्हर खराब होऊ शकतं. मात्र, आपल्या किचनमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही लिव्हर चांगलं ठेवू शकता.

साखर घातक

एक्सपर्ट सांगतात की, पांढरी साखर म्हणजे रिफाइंड शुगर दारूपेक्षाही घातक आहे. साखरेचा वापर आपण विचार न करता वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करत असतो. यामुळे लिव्हरमध्ये फॅट वेगाने जमा होण्यास मदत मिळते. ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या होते.

लिव्हरवर फॅट जमा होण्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज म्हटलं जातं. ही समस्या झाली तर लिव्हरचं काम कमजोर होतं. इतकंच नाही तर गूळही साखरे इतकाच लिव्हरसाठी घातक आहे. अशात काही गोष्टींचं सेवन करून तुम्ही लिव्हर निरोगी ठेवू शकता.

हळद-दूध

शरीराची वेदना दूर करण्यासाठी बरेच लोक दुधामध्ये हळद टाकून सेवन करतात. एक्सपर्ट सांगतात की, झोपण्याआधी एक ग्लास गरम दुधात चिमुटभर टाकून सेवन करावं. याने शरीर आतून साफ होतं. कारण हळदीमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात.

आवळा आणि लिंबू पाणी

लिव्हरवरून दारू आणि साखर दूर करण्यासाठी आवळ्याचं सेवन करू शकता. यातील व्हिटॅमिन सी मुळे लिव्हर साफ होतं. तसेच सकाळी तुम्ही रिकाम्या पोटी लिंबू पाणीही पिऊ शकता. एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून सेवन केल्याने डायजेशन चांगलं होतं आणि लिव्हरही साफ होतं.

ग्रीन टी आणि ताजी फळं

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुम्ही ग्रीन टी चं सेवन करू शकता. यातील अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे लिव्हर साफ होतं. त्याशिवाय आपल्या रोजच्या आहारात ताज्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा. यात फायबर आणि इतरही खूप पोषक तत्व असतात.

नारळ पाणी

नारळ पाण्यात भरपूर इलेक्ट्रोलाइट असतात. नारळ पाणी हे एक नॅचरल डिटॉक्स ड्रिंक मानलं जातं जे लिव्हरला हायड्रेट ठेवतं. सोबतच याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यासही मदत मिळते.

Web Title: Doctor told include these 6 home remedies to reduce fatty liver and to detox at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.