नेहमीच डोकं दुखतं का? डॉक्टरांनी सांगितल्या काही सोप्या टिप्स, फॉलो करू मिळेल आराम!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:51 AM2024-10-10T11:51:11+5:302024-10-10T12:02:31+5:30
Headache Causes : AIIMS दिल्लीच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका सहरावत अशा काही टिप्स दिल्या आहेत ज्या रोज डोकं दुखणाऱ्या व्यक्तींनी फॉलो करायला हव्यात.
Headache Causes : डोकेदुखीची समस्या लोकांना सामान्यपणे रोज होत असते. डोकेदुखीची कारणेही वेगवेगळी असतात. कधी पाणी कमी प्यायल्याने तर कधी जेवण किंवा नाश्ता न केल्याने डोकं दुखतं. तसेच तणाव किंवा क्षमतेपेक्षा जास्त काम केल्यानेही डोकं दुखतं. रोज किंवा एक दिवसआड डोकं दुखण्याची छोटी छोटी कारणे असू शकतात. अशात AIIMS दिल्लीच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका सहरावत अशा काही टिप्स दिल्या आहेत ज्या रोज डोकं दुखणाऱ्या व्यक्तींनी फॉलो करायला हव्यात. या टिप्स फॉलो करून तुम्ही रोजची डोकेदुखीची समस्या दूर करू शकता.
डोकेदुखी दूर करणारे उपाय
- सकाळचा नाश्ता कधीही स्किप करू नका. नाश्ता न केल्याने डोकं दुखतं.
- इंटरमिटेंट फास्टिंग केल्यानेही डोकं दुखतं. त्यामुळे असं काही करणं टाळावं.
- दिवसभरात भरपूर पाणी प्या. दिवसातून किमाम ६ ते ८ ग्लास पाणी प्यावे.
- रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये.
- दुपारी बाहेर जाणार असाल तर सनग्लासेस वापरा किंवा छत्रीचा वापर करा.
- सांयकाळी ६ वाजतानंतर चहा, कॉफी किंवा ग्रीन टी चं सेवन करू नका. ६ वाजतानंतर कॅफीन असलेलं ड्रिंक घेऊ नये.
- झोपण्याच्या २ तास आधी कोणत्याही डिजिटल डिवाइसपासून दूर रहा, जसे की, फोन, टीव्ही, लॅपटॉप.
- रोज झोपण्याची आणि सकाळी झोपेतून उठण्याची एकच वेळ ठरवा. रोज रात्री साधारण ७ ते ८ तासांची झोप घ्या.
- जर कुठे दूर प्रवास करत असाल तर दर ९० मिनिटांची ५ मिनिटांचा ब्रेक घ्या.
- फार जास्त आवाजापासून दूर रहा आणि फार जास्त आवाजात बोलूही नका. याने डोकेदुखी वाढते.