ही लक्षणे दिसली तर समजा ब्लॉक झाल्यात हृदयाच्या नसा, कधीही येऊ शकतो Heart Attack

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 01:23 PM2023-08-29T13:23:33+5:302023-08-29T13:24:25+5:30

Heart blockage symptoms: जेव्हा हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज होतात तेव्हा हृदयाचे ठोके अनियमित होतात.

Doctor told some warning signs and symptoms of heart blockage and heart attack | ही लक्षणे दिसली तर समजा ब्लॉक झाल्यात हृदयाच्या नसा, कधीही येऊ शकतो Heart Attack

ही लक्षणे दिसली तर समजा ब्लॉक झाल्यात हृदयाच्या नसा, कधीही येऊ शकतो Heart Attack

googlenewsNext

Heart blockage symptoms: हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर हृदयाचं इलेक्ट्रिक सिस्टम प्रभावित होतं. ही समस्या कोरोनरी आर्टी डिजीजपेक्षा वेगळी आहे. ज्यात हृदयाच्या रक्त वाहिन्यांवर प्रभाव पडतो. जेव्हा हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज होतात तेव्हा हृदयाचे ठोके अनियमित होतात. अशात हृदय सामान्यापेक्षा हळू गतीने काम करू लागतं. हृदयाचे ठोके एकावेळी 20 सेकंद उशीराने होतात.

हार्ट ब्‍लॉकेजची कारणे

काही लोकांमध्ये जन्मापासूनच हार्ट ब्लॉकेजची समस्या असते, या स्थितीला जन्मजात हार्ट ब्लॉक म्हटलं जातं. जर गर्भात अर्भकाचं हृदय योग्यप्रकारे विकसित झालं नाही तर अर्भकाला जन्मापासूनच हार्ट ब्लॉकेजची समस्या होते.

तसेच हृदयाची इलेक्ट्रिक सिस्टम प्रभावित करणारी एखादी सर्जरी, जीन्समध्ये बदल, हार्ट अटॅकने हृदयाची गती हळू होणे, धमण्यांमध्ये अडथळा, हृदयाच्या मांसपेशींमध्ये सूज आणि हार्ट फेल्युअरमुळे हार्ट ब्लॉक होऊ शकतं. अनेकदा एखाद्या औषधामुळेही हार्ट ब्लॉकेजची समस्या होऊ शकते. अशा स्थितीत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हार्ट ब्लॉकेजची लक्षणे

- हृदयाचे ठोके कमजोर होणे किंवा अनियमित होणे, तसेच घाबरल्यासारखं वाटणे

- श्वास घेण्यास समस्या होण

- डोक्यात चक्कर येणे

- छातीत वेदना आणि अस्वस्थ वाटणे

- शरीरार व्यवस्थित रक्त पुरवठा होत नसल्याने एक्सरसाइज करण्यात अडचण येणे

काय करावे उपाय?

डाळिंबाचा ज्यूस

वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, रोज एक कप डाळिंबाचा ज्यूस सेवन केल्याने रक्त शुद्ध होतं, रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतं. तसेच कोरोनरी आर्टरी डिजीजच्या रूग्णांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही कमी होतं. डाळिंबात असलेले पॉलीफेनॉल्स शरीरात प्लाक जमा होणं रोखतं.

दालचिनी

रोज 120 मिली ग्रॅम इतकी दालचिनी पावडर सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचं प्रमाण कमी होतं. हेही लक्षात घ्या की, बॅड कोलेस्ट्रॉल हार्ट ब्लॉकेजचं मुख्य कारण होऊ शकतं. याने व्यक्तीच्या हृदयासंबंधी इतरही समस्या वाढू शकतात.

लाल मिरची

बॅड कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाची धमण्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. लाल मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचं तत्व असतं ज्यात हे बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्याची क्षमता असते. कॅप्सेसिन ब्लड प्रेशर कमी करणे, हाय कोलेस्ट्रॉल आणि रक्ताच्या गाठी तयार होण्यापासून रोखल्या जातात.

लसूण

लसूण खाल्ल्याने केवळ हृदय निरोगी राहतं असं नाही तर अनेक आजारांपासून बचाव होतो. यात अ‍ॅंटीकोएगुलेंट गुण असतात जे रक्त पातळ करण्यास मदत करतात. या कारणाने लसूण हार्ट अटॅक आणि स्ट्रोकला रोखण्यास सक्षम असतं.

हळद

हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्व असतं ज्यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, सूज आणि रक्ताच्या गाठी रोखण्याची क्षमता असते. हळदीचं नियमित सेवन केल्याने आरोग्य चांगलं राहतं. याने हार्ट ब्लॉकेजची समस्याही कमी होते.

जर तुम्हाला हृदयासंबंधी समस्या असेल तर तुम्हाला नियमित चांगला आहार घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्ही आहाराचं नियोजन करू शकता.

Web Title: Doctor told some warning signs and symptoms of heart blockage and heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.