100 वर्ष जगण्याचा खास फंडा, हे फूड्स खाल तर दूर होईल अनेक समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 11:18 AM2024-03-02T11:18:48+5:302024-03-02T11:19:54+5:30

जेनेटिक्स, दुर्घटना आणि आजारामुळे मृत्यूसारख्या कारणांना कंट्रोल केलं जाऊ शकत नाही.

Doctor told to include 10 flavonols rich foods to increase longevity and life expectancy | 100 वर्ष जगण्याचा खास फंडा, हे फूड्स खाल तर दूर होईल अनेक समस्या

100 वर्ष जगण्याचा खास फंडा, हे फूड्स खाल तर दूर होईल अनेक समस्या

प्राचीन काळापासून आजपर्यंत लोक जास्त जीवन जगण्याचा उपाय शोधत आहेत. पण आजकाल वेगवेगळ्या आजारांमुळे लोकांचं आयुष्य कमी झालं आहे. मात्र जगात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे लोक 100 वर्ष जगतात. मरेपर्यंत ते तरूण आणि शक्तीशाली राहतात.

100 वर्ष जगण्याचा उपाय

जेनेटिक्स, दुर्घटना आणि आजारामुळे मृत्यूसारख्या कारणांना कंट्रोल केलं जाऊ शकत नाही. पण काही लोक एक्सरसाईज करणे, स्मोकिंग न करणे आणि अल्कोहोल लिमिटमध्ये प्यायले आणि डाएटची काळजी घेतली तर ते जास्त काळ जगू शकतात. सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, हाय फ्लेवेनोल्समुळे मरणाऱ्यांच्या या सगळ्या कारणांचा धोका दूर केला जाऊ शकतो.

फ्लेवेनोल्स काय आहे?

फ्लवोनोइड अनेक प्लांट बेस्ड फूडमधून मिळतं. एक्सपर्ट्स इंफ्लामेशन, ऑक्सीडेटिव स्ट्रेस आणि ब्लड प्रेशरमध्ये याचं सेवन करण्याचा सल्ला देतात. याने ब्लड फ्लो चांगला होण्यास मदत मिळते. काही रिसर्चमधून असंही स्पष्ट झालं आहे की, याने कॅन्सरच्या गाठी नष्ट करण्यासही मदत मिळते.

या आजारांमध्ये फायदा

रिसर्चमध्ये सहभागी डायबिटीटस, हायपरटेंशन, कोरोनरी हार्ट डिजीज, एंजायना, स्ट्रोक, हार्ट अटॅक, हायपरलिविडेमिया, कंजेस्टिव हार्ट फेलिअरसंबधी होते. पण हाय फ्लेवेनोल्स घेतल्यानंतर मृत्युच्या या सगळ्या कारणांमध्ये कमी बघण्यात आली.

कोणते फ्लेवेनोल्स घ्यावे?

वयाआधीच मृत्युची शक्यता कमी करण्यासाठी रिसर्चमध्ये quercetin, kaempferol, myricetin आणि isorhamnetin ला प्रभावी बघण्यात आलं. भारतातील डॉक्टर सुषमा आर. चाफळकर यांनी न्यूज मेडिकल लाइफ सायन्सवर फ्लेवेनोल्स मिळवणारे मुख्य फूड्सबाबत सांगितलं.

या 3 फूड्समध्ये जास्त असतं फ्लेवेनोल्स

चहा

कांदा

बेरीज

हाय फ्लेवेनोल्स असलेले 10 फूड्स

कच्च्या केळींमध्ये जास्त फ्लेवेनोल्स

लाल कांद्यांमध्ये जास्त फ्लेवेनोल्स

सफरचंद सालीसोबत खाल तर जास्त फायदा होईल

ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरीमध्ये जास्त फ्लेवेनोल्स असतं

ग्रीन टी आणि ब्लॅक टी ज्यास्त फायदेशीर

रेड वाईनमध्येही फ्लेवेनोल्स आणि एंटीऑक्सीडेंट्स गुण

टोमॅटो कच्चे आणि पिकलेले दोन्ही फायदेशीर

ब्रोकली खाऊनही तुम्हाला फायदा होऊ शकतो

Web Title: Doctor told to include 10 flavonols rich foods to increase longevity and life expectancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.