च्युइंगम चघळता चघळता चुकून गिळलत का? 'या' समस्यांचा सामना करण्यासाठी रहा तयार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 17:42 IST2018-10-17T17:37:49+5:302018-10-17T17:42:04+5:30
अनेकांना च्युइंगम खाण्याची सवय असते. तर काही लोक च्युइंगम चघळता चघळता चुकून ते च्युइंगम गिळून देखील टाकतात. काही दिवसांनी हे च्युइंगम पोटातून बाहेर टाकले जाते.

च्युइंगम चघळता चघळता चुकून गिळलत का? 'या' समस्यांचा सामना करण्यासाठी रहा तयार!
अनेकांना च्युइंगम खाण्याची सवय असते. तर काही लोक च्युइंगम चघळता चघळता चुकून ते च्युइंगम गिळून देखील टाकतात. काही दिवसांनी हे च्युइंगम पोटातून बाहेर टाकले जाते. परंतु, कधी कधी ते पोटामध्ये अडकते. असं झाल्यास त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात. जाणून घेऊया चुकून च्युइंगम गिळल्यामुळे तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्याबाबत...
च्युइंगममध्ये असतात ही तत्व -
च्युइंगममध्ये बेस, रंग, साखर, गंध, रेजिन, मेण, इलास्टोमर आणि पायसिकारी तत्व असतात. जेव्हा हे च्युइंगम पोटाच्या आत जातं त्यावेळी पोटामध्ये हायड्रो क्लोरिक अॅसिड च्युइंगममध्ये असलेली तत्व वेगळी करतं.
पोटामधील अॅसिड साधारणतः साखर, ग्लिसरीन आणि गोडवा आणण्यासाठी वापरण्यात आलेलं पेपरमिंट ऑयलसारख्या सॉफ्टनरला वेगळं करून शरीरातून बाहेर टाकतं. पोटाच्या आतड्यांमध्ये पोहोचल्यानंतर च्युइंगम शरीरातून बाहेर टाकण्यात येतं. परंतु हे शरीरातून पूर्णपणे बाहेर येण्यास 25 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. परंतु तरीदेखील हे च्युइंगम बाहेर पडलं नाही तर मात्र तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
1. ब्लड प्रेशरचा धोका
जर च्युइंगम चघळताना तुम्ही चुकून गिळलतं आणि ते शरीरातून बाहेर टाकलं नाही गेलं तर त्याचं तापमान सामान्यतः वाढू लागतं. त्यामुळे शरीरातील ब्लड प्रेशरदेखील वाढू लागतं.
2. डायरिया आणि उलट्या
जर च्युइंगम गिळल्यानंतर एक दिवसाआधी शरीराबाहेर टाकलं गेलं नाही तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. नाहीतर तुम्हाला उलट्या होणं, डायरिया आणि अस्वस्थ वाटणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
3. अॅलर्जी आणि इन्फेक्शन
च्युइंगममध्ये हानिकारक कलर आणि प्रिजर्वेटिव्स असतात. ज्यामुळे ते पोटामध्ये लवकर पचत नाही. जर च्युइंगम एक दिवसामध्ये शरीराबाहेर टाकलं गेलं नाही तर तुम्हाला इंफेक्शन किंवा अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो.
4. आतडी कमजोर होतात
ज्यावेळी च्युइंगम गिळलं जातं त्यावेळी याचा परिणाम आतड्यांवर होतो. त्यामुळे आतडी कमजोर होतात.