डाळ शिजवताना केलेल्या 'या' एका चुकीमुळे शरीरात वाढतं Uric Acid, तुम्हीही करता का 'ही' चूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 01:18 PM2024-09-21T13:18:38+5:302024-09-21T13:31:57+5:30
Dal Causing high uric acid: अनेकदा डाळीच्या सेवनाने यूरिक अॅसिड लेव्हल वाढते. याचं कारण म्हणजे डाळ शिजवण्याची तुमची पद्धत.
Dal Causing high uric acid: वेगवेगळ्या डाळी जवळपास रोज प्रत्येक घरांमध्ये बनवल्या जातात. डाळींमधून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. खासकरून डाळींमधून प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळते. तसेच डाळींमधून डायटरी फायबर, झिंक आणि व्हिटॅमिन बी १२ सुद्धा मिळतं. त्यामुळे बालपणापासून डाळींचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
डाळींमुळे पोट लवकर भरतं आणि लोकांना चांगलं वाटतं. पण काही लोकांनी डाळींच्या सेवनाने काही समस्याही होतात. अशीच एक समस्या म्हणजे यूरिक अॅसिड वाढणं. अनेकदा डाळीच्या सेवनाने यूरिक अॅसिड लेव्हल वाढते. याचं कारण म्हणजे डाळ शिजवण्याची तुमची पद्धत. जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवत असाल तर याने यूरिक अॅसिड वाढण्याचा धोका वाढतो. अशात प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवल्याने यूरिक अॅसिड का वाढतं आणि डाळ शिजवण्याची योग्य पद्धत काय? हे जाणून घेऊया.
प्रेशर कुकरमधील डाळीने वाढतं यूरिक अॅसिड
शरीरात यूरिक अॅसिडचं निर्माण प्यूरीन नावाच्या तत्वामुळे होतं. जे खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टींमध्ये असतं. डाळींमध्ये थोड्या प्रमाणात प्यूरीन आढळतं. पण हे इतकंही जास्त नसतं की, शरीरात यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढले. पण डाळ शिजवण्याची पद्धत चुकीची असेल तर मग समस्या होते.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, डाळ शिजवताना त्यावर पांढरा फेस येतो. बरेच लोक पातेल्यामध्ये डाळ शिजवताना हा फेस काढून टाकतात. मात्र, प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवताना हा फेस डाळीमध्येच मिक्स होतो.
एक्सपर्टनुसार, या फेसामध्ये स्टार्चसोबतच प्रोटीन आणि सॅपोनिन आढळतं. हेच सॅपोनिन शरीरात पोहोचून अॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं आणि याने कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. त्यामुळे जर तुम्ही कमी प्रमाणात डाळ खात असाल तर याने तुम्हाला काही समस्या होणार नाही. पण जर तुम्ही अधिक प्रमाणात सॅपोनिन किंवा प्यूरीन असलेली डाळ खात असाल तर यूरिक अॅसिडची समस्या होऊ शकते.
कोणत्या डाळीत जास्त असतं प्यूरीन?
राजमा, मटर, सोया, काळे मटर या धान्यांमध्ये आणि यांपासून तयार डाळींमध्ये सॅपोनिन आणि प्यूरीन दोन्ही आढळतात. त्यामुळे यांचे सेवन कमी करावं.
तसेच डाळींमध्ये टाकला जाणारा कांदा, पालक, लसूण यांमध्येही सॅपोनिन आढळतं. या सॅपोनिनने डाळींमध्ये फेस तयार होतो.
यूरिक अॅसिड रोखण्याचे उपाय
- एक्सपर्टनुसार, जेव्हाही तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवाल तेव्हा मीठ आणि हळद सारख्या किंवा टोमॅटोसारख्या गोष्टी टाकू नका. या गोष्टी डाळ थोडी शिजल्यानंतर टाकाव्यात.
- कधीही डाळ शिजवताना त्यात थोडं तेल टाकावा. याने डाळीमध्ये फेस कमी तयार होईल.
- ज्या डाळींमध्ये प्यूरीन किंवा सॅपोनिन आढळतं अशा डाळींचं सेवन कमी करा. भुरक्या किंवा हिरव्या रंगाच्या डाळींमध्ये प्युरीन कमी असतं. या डाळींचा आपल्या नियमित आहारात समावेश करावा.