घाईघाईत खाणं ठरू शकतं वजन वाढण्याचं कारणं; अन्न चावून खाल्यानं शरीराला 'असा' होतो फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 11:52 AM2021-03-09T11:52:57+5:302021-03-09T12:03:19+5:30
Health Tips in Marathi : रोजच्या अशा काही सवयींमुळे माणसाचं वजन कमी होता होत नाही. त्यामुळे फिटनेसवर प्रभाव पडतो यामुळे आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. आहारातील वेगवेगळ्या सवयी बदलून तुम्ही आरोग्याची चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊ शकता.
तुम्ही जेवण हळूहळू करता की पटापट? जर तुम्ही जेवण पटापट करत असाल तर वेळीच सावध होण्याती गरज आहे. कारण एका अभ्यासानुसार, चावून चावून न खाता घाईने जेवणाऱ्यांचं वजन हळू जेवणाऱ्यांच्या तुलनेत वेगाने वाढतं. त्यामुळे जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर वेळीच ही सवय बदला. जीवनशैलीतील वेगवेगळ्या सवयींचा आणि बदलांचा माणसाच्या आरोग्यावर नकारात्मक आणि सकात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होत असतो. जर वजन कमी करण्याबाबत विचार केला तर रोजच्या अशा काही सवयींमुळे माणसाचं वजन कमी होता होत नाही. त्यामुळे फिटनेसवर प्रभाव पडतो यामुळे आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. आहारातील वेगवेगळ्या सवयी बदलून तुम्ही आरोग्याची चांगल्या पद्धतीनं काळजी घेऊ शकता.
कमी वेगानं जेवणं आणि वजन कमी होणं
प्रत्येक व्यक्तीचा जेवणाचा वेग वेगवेगळा असतो. काही लोक म्हणतात की, हळू हळू खाल्यानं लोक आळशी आणि आजारी होतात. वास्तविक पाहता हळू हळू जेवल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करणारे लोक दिवसभर शरीरात घेतल्या जात असलेल्या कॅलरीजवर लक्ष देतात. हळूहळू जेवणाच्या सवयीमुळे पोट पूर्णपणे भरलेलं वाटतं लवकर भूक लागत नाही. त्यामुळे लोक जास्त कॅलरिज घेत नाहीत. परिणामी वजन कमी व्हायला सुरूवात होते.
पोषक तत्व मिळतात
बरेच लोक वेगाने अन्न खातात आणि नंतर पोटात दुखणं आणि अपचन होण्याचा सामना करावा लागतो. हळू हळू खाल्ल्याने पचन सुधारते आणि अन्न सहज पचते. यासह, शरीराद्वारे पोषक द्रव्यांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. अन्न हळूहळू चघळण्याने आणि खाण्याने मेंदू निरोगी आणि शांत राहतो. यामुळे तणावाची पातळी कमी होते आणि मन शांत होते.
हळूहळू जेवल्यानं खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते. हळूहळू अन्न खाऊन तुम्ही अन्नाची चव अधिक चांगल्या प्रकारे उपभोगू शकता. या व्यतिरिक्त, अन्नाचा स्वाद, सुगंध आपल्याला समाधान देईल. International Women's Day: आता महिला बिंधास्तपणे वापरू शकतात Menstrual Cups; असा करा वापर
भूक कमी लागते
आपली भूक आणि कॅलरीचे प्रमाण हार्मोन्सद्वारे मोठ्या प्रमाणात नियंत्रित केले जाते. जेवणानंतर, आपले आतडे घरेलिन नावाचे हार्मोन दाबून ठेवते, जे भूक नियंत्रित करते आणि पोट भरते. हे अतिसेवनापासून बचाव करण्यास मदत करते. या प्रक्रियेस सुमारे 20 मिनिटे लागतात. सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं
सकारात्मक प्रभाव
जेवण चावून चावून खाल्ल्यास अनेक फायदे होतात. याने पदार्थांमधील प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स इतर पोषक तत्वांचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. याने तुम्हाला आवश्यक तत्त्वे मिळतात आणि शरीर निरोगी राहतं.
कॅविटीपासूनच बचाव
जेवण चांगल्याप्रकारे बारीक चावून खाल्ल्याने दातांमध्ये पदार्थांचे कण अडकत नाहीत. याने दातांना किड लागत नाही आणि तोंडाची दुर्गंधीही येत नाही.
बॅक्टेरिया नष्ट होतात
जेवण चांगल्याप्रकारे चावून खाल्ल्यास तोंडातील वाईट बॅक्टेरिया नष्ट होतात. हळूहळू खाल्ल्याने तोडांत तयार होणारी लाळ बॅक्टेरिया नष्ट करते. याने शरीराला बॅक्टेरिअल संक्रमण होण्यापासून बचाव होतो.