हळदीमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो का? हळद किती सेफ आणि किती घातक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:29 IST2025-02-22T13:29:06+5:302025-02-22T13:29:35+5:30

Is turmeric bad for kidney: काही लोकांचं मत आहे की, हळद आपल्या किडनींसाठी चांगली नसते. यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊया.

Does eating turmeric pose a risk of kidney stones? Know what expert says | हळदीमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो का? हळद किती सेफ आणि किती घातक?

हळदीमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो का? हळद किती सेफ आणि किती घातक?

Is turmeric bad for kidney: भारतीय पदार्थांमध्ये हळदीला फार महत्व आहे. हळदीशिवाय अनेक पदार्थ बनूच शकत नाहीत. हळदीनं पदार्थांना रंग-टेस्ट तर मिळतेच, सोबतच यात अनेक औषधी गुणही असतात. ज्याकारणानं आयुर्वेदातही हळदीला खूप महत्व आहे. वेगवेगळ्या उपचारांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीमधील करक्यूमिन, अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी तत्व आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, काही लोकांचं मत आहे की, हळद आपल्या किडनींसाठी चांगली नसते. यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊया.

हळद किडनीसाठी नुकसानकारक?

एशियन हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट मेडिसीनचे डायरेक्टर आणि हेड डॉ. रितेश शर्मा (Dr. Reetesh Sharma) यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, "जेव्हा हळदीचं सेवन संयमानं केलं जातं तेव्हा ती किडनीसाठी टॉक्सिक ठरत नाही. समस्या याचा जास्त वापर केल्यानं होते. कारण फार जास्त करक्यूमिन घेतल्यानं लघवीमध्ये ऑक्सालेटचं प्रमाण खूप वाढतं. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका अधिक वाढतो".

जास्त हळद खाण्याचे नुकसान

हळदीमध्ये ऑक्सालेटचं प्रमाण भरपूर असतं, ज्याचा अर्थ जर तुम्ही हळद वेगवेगळ्या माध्यमातून जास्त खात असाल तर किडनी स्टोन तयार होण्यास मदत मिळते. खासकरून अशा लोकांना जास्त धोका असतो ज्यांना आधीच किडनी स्टोनची समस्या आहे किंवा होऊन गेली आहे.

जेवणातील हळदीचं कमी प्रमाण नुकसानकारक नाही. मात्र, जर याचा जास्त वापर केला गेला तर किडनीवर जास्त दबाव पडू शकतो. त्याशिवाय काही रिपोर्ट्स सांगतात की, हळदीचं जास्त प्रमाण आधीच आजारी असलेल्या लोकांमध्ये किडनी फेलिअरचं कारणही ठरू शकतं.

कारण किडनींना शरीरातील अतिरिक्त रसायनं फिल्टर करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. ज्यामुळे टॉक्सिन वाढू शकतात. हळद किडनीचा आजार, डायबिटीस किंवा ब्लड क्लॉटिंगच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसोबत रिअॅक्ट होऊ शकते.

एमडीपीआय (MDPI) द्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, करक्यूमिनचा जास्त डोस नेफ्रोटॉक्सिक इफेक्ट टाकू शकतो आणि रीनल डॅमेज वाढू शकतं. ज्यांना किडनी डिजीज आहे त्यांना याचा धोका अधिक असतो.

हळदीचा सुरक्षित वापर कसा करावा?

भाजी, सूप, चहा, काही पदार्थांमध्ये हळदीचा कमी प्रमाणात वापर सुरक्षित असतो. कॅल्शिअम रिच फूड्स जसे की, डेअरी प्रोडक्ट्स, पालेभाज्या, बदाम यात हळद मिक्स केली तर ऑक्सालेट कमी करण्यास मदत मिळते आणि त्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोकाही कमी होतो.

Web Title: Does eating turmeric pose a risk of kidney stones? Know what expert says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.