जास्त साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो का? जाणून घ्या काय आहे सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 10:25 AM2023-09-26T10:25:13+5:302023-09-26T10:26:13+5:30

आज आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहोत ज्या केवळ गैरसमज आहेत. यात जराही सत्यता नाही. पण लोक यांना सत्य मानतात. 

Does excess sugar consumption is the main cause of diabetes know myths and facts | जास्त साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो का? जाणून घ्या काय आहे सत्य...

जास्त साखर खाल्ल्याने डायबिटीस होतो का? जाणून घ्या काय आहे सत्य...

googlenewsNext

आरोग्य चांगलं ठेवण्यात आपल्या आहाराची मोठी भूमिका असते. पण लोक आपल्या आहाराबाबत अनेक चुका करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहोत ज्या केवळ गैरसमज आहेत. यात जराही सत्यता नाही. पण लोक यांना सत्य मानतात. 

गैरसमज - डाएटमधून मीठ कमी करणं सोपं आहे

सत्य - चिंताजनक बाब ही आहे की, जास्तीत जास्त लोक जेवण बनवताना सगळ्या गोष्टींमध्ये मीठ टाकतो. असे बरेच पदार्थ असतात जे विना मीठ आपण खाऊ शकतो. पण आपण काळजी घेत नाही. असं केलं नाही तरी प्रोसेस्ड पदार्थांमध्ये लपलेलं मीठ तुमचा आहार घातक करू शकतात. चिकन सूप, लोणचं, पापड, पीनट बटर, ब्रेड, मॅकरोनी, पनीर, केचअप, पिझ्झा, सलाद ड्रेसिंग, डब्बाबंद फूड इत्यादींमध्ये मीठ खूप असतं.

गैरसमज - हाडांसाठी कॅल्शिअमच गरजेचं 

सत्य - आपल्या हाडांसाठी केवळ कॅल्शिअमचं नाही तर  व्हिटॅमिन्स आणि खनिजही गरजेचे आहेत. सामान्यपणे 40 वयानंतर नियमितपणे व्यायाम करायला हवा. जिम, एरोबिक्स, धावणं, वेगाने चालणं इत्यादी. आपल्या सुविधेनुसार काहीही निवडा. 

गैरसमज - डायबिटीसचं मुख्य कारण साखर

सत्य - लठ्ठपणा डायबिटीसचं मुख्य कारण आहे. गेल्या काही वर्षात टाइप 2 डायबिटीसच्या केसेस चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढल्या आहेत. जर वजन फार जास्त असेल तर डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. जास्त काळ अधिक कॅलरींचं सेवन केलं तर लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका वाढतो.

गैरसमज - फॅट फ्री डाएट हृदयासाठी चांगली

सत्य - विषय केवळ सॅच्युरेटेड फॅटचा नाहीये, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते. अमीनो अॅसिड होमोसिस्टीनची लेव्हल वाढली तर धमण्यांवर फार वाईट प्रभाव पडतो. व्हिटॅमिन बी, शरीरात होमोसिस्टीनने तयार होणाऱ्या अमीनो अॅसिडचा वापर करतं. अशात जर होमोसिस्टीन फार जास्त वाढलं तर शक्य आहे की, तुम्ही व्हिटॅमिन बी युक्त पदार्थ कमी खाऊ शकता. चांगलं आहे की, फोलिक अॅसिडयुक्त गोष्टी जसे की, हिरव्या पालेभाज्या, कंदमूळं, फळं, नट्स आणि डाळींचं सेवन जास्त करा. 

Web Title: Does excess sugar consumption is the main cause of diabetes know myths and facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.