दिवसभर सतत थकवा जाणवतो का?; असू शकतात ही गंभीर कारणं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 11:45 AM2019-04-21T11:45:50+5:302019-04-21T11:47:51+5:30
सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्यानंतर कोणालाही थकवा जाणवणं स्वाभाविक आहे. पम काही लोक असे असतात, ज्यांना रात्री शांत झोप घेतल्यानंतरही सकाळी थकवा जाणवतो.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केल्यानंतर कोणालाही थकवा जाणवणं स्वाभाविक आहे. पम काही लोक असे असतात, ज्यांना रात्री शांत झोप घेतल्यानंतरही सकाळी थकवा जाणवतो. पण जर तुम्ही दिवसभर थकलेले असाल किंवा कोणतंही काम सुरू करण्याआधीपासूनच तुम्हाला थकवा जाणवत असेल तर हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. अशावेळी शरीरासोबतच मानसिक आरोग्य तपासणंही गरजेचं आहे. जर याकडे दुर्लक्ष केलं तर शरीराच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ही असू शकतात थकवा येण्याची कारणं :
रक्ताची कमतरता
भारतामध्ये जास्तीत जास्त महिलांमध्ये रक्ताची कमतरता आढळून येते. याच कारणामुळे अनेक महिलांना अनीमियासारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. अनीमिया किंवा शरीरातील रक्तपेशींची कमतरता, थकवा जाणंवणं यांसाख्या गोष्टी शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे जाणवते. एनीमिया शरीरातील pigmentation दूर करते. ज्यामुळे त्वचा पिवळी दिसू लागते. असं होणं हे अनीमियाचं पहिलं लक्षणं आहे. लाल रक्ताच्या पेशी फुफ्फुसांमधून इतर ऊती आणि पेशींपासून ऑक्सिजनचे वाहक असतात. आयर्न आणि काही निश्चित व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे अनीमिया होऊ शकतो. याव्यतिरिक्त, रक्ताची कमतरता, शरीरामध्ये रक्तस्त्राव होणं, कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांमुळेही अनीमिया होऊ शकतो. हृदयाची गति वाढणं, सतत थकवा जाणवणं, छातीमध्ये वेदना होणं, झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागणं, एकाग्रतेची कमतरता, डोकेदुखी यांसारखी लक्षणंही एनीमियाने पीडित असणाऱ्या लोकांमध्ये दिसून येतात.
व्हिटॅमिन डीची कमतरता
व्हिटॅमिन डीची कमतरता थकवा येण्याचं एक मुख्य कारण असंही म्हणू शकतो. आपल्या देशामध्ये मुबलक प्रमाणात ऊन असतं. परंतु तरिदेखील अनेक लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून येते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे वजम कमी होणं, हाडं ठिसूळ होणं, थकवा येणं, सांधेदुखी यांसारखी लक्षणं दिसून येतात. असं सांगण्यात येतं की, व्हिटॅमिन्समुळे आपली हाडं मजबुत होण्यास मदत होते. खरं तर व्हिटॅमिन डीची कमतरता सूर्याचा प्रकाश कमी मिळाल्यामुळे होते.
थायरॉइड
आतापर्यंत असं मानलं जात होतं की, फक्त महिलांना या आजाराचा सामना करावा लागतो. पण आता पुरूषांमध्येही या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. हायपोथायरॉयडिज्म म्हणजेच ती स्थिती असते जेव्हा थायरॉइड ग्रंथीमुळे थायरॉइड हार्मोन्सची निर्मिती कमी होते. अशात स्थितीत वजन वाढणं सामान्य बाब आहे. थायरॉइड हार्मोन्स जास्त प्रमाणात असल्यानेही वजन अधिक वाढतं. भारतात राहणाऱ्या 42 लोकांना थायरॉइडची समस्या आहे. थायरॉइड असणाऱ्या लोकांनाही सतत थकवा जाणवत असतो.
लिव्हरच्या समस्या
जर तुमचं लिव्हर व्यवस्थित काम करत नसेल तर थकवा जाणवतो. पण लिव्हरच्या समस्यांचा लगेच शोध घेणं अशक्य असतं. लिव्हर संक्रमण, जळजळ, लिव्हर विकार आणि थकवा यांसाठी लिव्हरचं फंक्शन टेस्ट करण्यात येतात. लिव्हरचं आरोग्य, रक्तातील प्रोटीन, लिव्हर एंजाइम आणि बिलीरूबिनचा स्तर तपासण्यात येतो.
डायबिटीज
तुम्ही डायबिटीक आहात की नाही हे माहीत करून घेणं अत्यंत कठिण असतं. जेव्हा मधुमेह होतो. त्यावेळी शरीर ग्लुकोज म्हणजेचं साखरेचा व्यवस्थित वापर करण्यास असमर्थ असतं. अशावेळी रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढते आणि शरीरातील उर्जेचा स्तर कमी होतो. परिणामी शरीराला थकवा जाणवतो. भूक, वजन कमी होणं, सतत लघवी होणं, तहान लागणं, चिडचिड होणं, धुरकट दिसणं यांसारख्या समस्यांचा सामना करणं यांसारखी लक्षणं दिसून येतात.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.