उंची न वाढण्याबाबतचा 'हा' गैरसमज तुमच्यातही आहे का? समजून घ्या उंची वाढण्याचं सायन्स....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 10:33 AM2019-12-17T10:33:44+5:302019-12-17T10:42:36+5:30

अनेक लोकांचा असाही समज आहे की, कमी वयात हेवी वेट उचलल्यानेही उंची खुंटते. त्यामुळे अनेक तरूण जिममध्ये वर्कआउट करणंच सोडतात.

Does lifting heavy weights during young age stunt your height and growth | उंची न वाढण्याबाबतचा 'हा' गैरसमज तुमच्यातही आहे का? समजून घ्या उंची वाढण्याचं सायन्स....

उंची न वाढण्याबाबतचा 'हा' गैरसमज तुमच्यातही आहे का? समजून घ्या उंची वाढण्याचं सायन्स....

googlenewsNext

(Image Credit : 24life.com)

चांगल्या उंचीमुळे व्यक्तीच्या पर्सनॅलिटीला चार चॉंद लागतात. तसेच चांगल्या उंचीमुळे कुणाचाही आत्मविश्वासही वाढतो. पण अलिकडे काही मुलं कमी उंचीमुळे नकारात्मक विचारांचे शिकार होताना दिसतात. १८ वयोगटातील काही मुलं तर उंची वाढवण्यासाठी डॉक्टरांकडेही जातात.

अनेक लोकांचा असाही समज आहे की, कमी वयात हेवी वेट उचलल्यानेही उंची खुंटते. त्यामुळे अनेक तरूण जिममध्ये वर्कआउट करणंच सोडतात. जर तुम्हीही असा विचार करत असाल आम्ही तुम्हाला सांगतो की, सायन्स याला सपोर्ट करत नाही.

वेट ट्रेनिंग आणि उंची खुंटण्याचा गैरसमज

(Image Credit : shape.com)

जगभरात हा एक मोठा गैरसमज आहे की, हेवी वेट उचलल्याने उंची घटते. यात लोक असा तर्क लावतात की, खांद्यावर जास्त वजन पडल्याने शरीराचा विकास थांबतो. म्हणजेच उंची कमीच राहते. 

उंची वाढण्याचं सायन्स

शरीराच्या विकासादरम्यान शरीरातील लांब हाडांच्या प्लेटोंचा आकार वाढतो. त्याला एपिफिशिअल प्लेट्स असंही म्हणतात. वेट ट्रेनिंग किंवा वर्कआउटचा थेट संबंध टेस्टोस्टेरॉन निर्मितीशी आहे. याने मसल्स वाढण्यास, मजबूत होण्यास आणि लेंथ वाढण्यास मदत होते. याचा पूर्णपणे उंची वाढण्याशी काहीही संबंध नाही.

(Image Credit : bespokeunit.com)

तरूण वयात शरीरात टेस्टोस्टेरॉन आणि इतरही बॉडी ग्रोथ म्हणजेच शरीराच्या विकासात मदत करणारे हार्मोन्स रिलीज होतात. अशात वेट ट्रेनिंग शरीरासाठी वरदान ठरू शकते. ऑस्टियोसाइट सेल्स(हाडांचे टिश्यू तयार करणारे सेल्स) वाढल्याने हाडांची लांबी वाढते. त्याचाच परिणाम म्हणजे तुमची उंची वाढते. वजन उचलल्याने उंची खुंटते असं कोणत्याही रिसर्चमधून सांगण्यात आलेलं नाही.

औषधाने उंची वाढते का?

(Image Credit : home-remedies.wonderhowto.com)

हे एक सत्य आहे की, उंची वाढवण्याचा दावा करणाऱ्या औषधांनी उंची वाढत नाही. याने शरीरात हार्मोन्सची अ‍ॅक्टिविटी वाढते. या कारणाने उंची वाढू शकते. उंची वाढवण्याच्या गोळ्यांनी शरीराला प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिनसारखे पोषक तत्व मिळतात. पण ही औषधे केवळ आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला हवीत. अन्यथा महागात पडू शकतं.

उंची वाढवण्यासाठी उपाय

- शरीराची वाढ ही त्या व्यक्तीच्या जीन्स, आहार आणि हाडांच्या स्थितीवर अवलंबून असते. तुमच वय जर १८ आहे तर तुमची उंची एक ते दोन इंच वाढू शकते. पण यासाठी तुम्हाला फिजिकली अॅक्टिव रहावं लागेल. यासाठी तुम्ही स्वीमिंग, रनिंग, हॅगिंग, टो-टच, सुपर स्ट्रेच, स्किपिंग करू शकता.

- तसेच नियमित पुरेशी झोप घेतल्यानेही तुमच्या शरीराची वाढ व्यवस्थित होते आणि टिश्यूज रि-जनरेट होण्यास मदत मिळते. त्यामुळे नैसर्गिकरित्या उंची वाढण्यासाठी झोप महत्वाची आहे.

(Image Credit : Twitter)

- शरीराची वाढ होण्यात न्यूट्रिएंटची महत्वाची भूमिका असते. नेहमी व्हिटॅमिन्स, मिनरल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटने भरपूर पदार्थ खावेत. 

- तसेच शरीराची वाढ व्यवस्थित होण्यासाठी पाणीही महत्वाचं आहे. शरीर नेहमी डायड्रेट ठेवावं आणि पाणी पित रहावं. 


Web Title: Does lifting heavy weights during young age stunt your height and growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.