कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; जाणून घ्या, यामागील तथ्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 01:44 PM2024-07-07T13:44:27+5:302024-07-07T13:55:10+5:30
सोशल मीडियावर आपण नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचले आहेत. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे एक किंवा दोन नाही तर अनेक फायदे आहेत.
सोशल मीडियावर आपण नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचले आहेत. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे एक किंवा दोन नाही तर अनेक फायदे आहेत. पचनक्रिया सुधारते, तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि रोगांपासून तुमचं रक्षण होतं असं म्हटलं जातं.
यासोबतच तुमच्या त्वचेलाही याचा खूप फायदा होतो आणि वजनही कमी होण्यास मदत होते. विशेषतः कोमट पाण्याने वजन कमी करण्याचा किंवा पोटाची चरबी कमी करण्याचा दावा खूप प्रसिद्ध आहे. पण या दाव्यात नेमकं कितपत तथ्य आहे ते जाणून घेऊया...
गरम किंवा कोमट पाणी किती फायदेशीर?
गरम पाण्याने चरबी कमी होत नाही परंतु शरीराला चांगले हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते. चहा-कॉफी सारख्या कॅलरी पेयांपेक्षा गरम पाण्याची निवड केल्याने तुमचं एकूणच वजन कमी करण्याचं ध्येय असल्यास त्यासाठी मदत होते. यासोबतच संतुलित आहार आणि नियमित शारीरिक हालचाली केल्यास अधिक लवकर चांगले परिणाम मिळतील.
डॉक्टर काय म्हणतात?
गुरुग्रामच्या मारेंगो एशिया हॉस्पिटलच्या डॉ. वंशिका भारद्वाज यांनी IndiaToday.In ला दिलेल्या माहितीनुसार, गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील चरबीचे रेणू अधिक कार्यक्षमतेने नष्ट होतात, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र यावेळी आपल्या शरीरासाठी योग्य ठरेल इतकंच गरम पाणी प्यावं अन्यथा तोंडाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाणी प्या.
गरम पाणी पिण्याचे फायदे
- गरम किंवा कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
- तज्ज्ञांनी सांगितले की गरम पाणी कोरड्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यास मदत करते.
- डॉ. भारद्वाज म्हणाल्या की, चांगल्या परिणामांसाठी सकाळी उठल्याबरोबर आणि जेवणापूर्वी गरम पाणी प्या.
- पाण्याचे तापमान सुमारे ५० डिग्री सेल्सिअस असावं. आंघोळीपूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने ब्लडप्रेशर कमी होण्यास मदत होते.
- जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटते, ज्यामुळे कॅलरी कमी होऊ शकतात.
- तज्ज्ञांच्या मते, गरम पाणी रक्तदाब नियंत्रित करण्यास, त्वचेची चमक वाढविण्यास, पचनास मदत करण्यास, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करतं.
किती पाणी प्यावं?
डॉ. भारद्वाज म्हणाल्या की, जर तुम्हाला हे सर्व फायदे मिळवायचे असतील तर दिवसभरात किमान पाच ग्लास गरम पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दररोज आठ ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड आणि संतुलित राहतं.