बटाटा खाल्ल्याने खरंच आपण बटाट्यासारखे होतो का? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 03:45 PM2021-11-22T15:45:53+5:302021-11-22T15:58:18+5:30

लठ्ठ व्यक्तीची फक्त बटाट्याशी तुलनाच नाही तर बटाटा खाल्ल्याने लठ्ठ व्हायला होतं, असंही सांगितलं जातं. पण खरंच  बटाट्याने वजन वाढतं का, बटाट्यामुळे आपण लठ्ठ होतो का?

does potato increase your weight know the truth from expert Siddharth Bhargava | बटाटा खाल्ल्याने खरंच आपण बटाट्यासारखे होतो का? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

बटाटा खाल्ल्याने खरंच आपण बटाट्यासारखे होतो का? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

googlenewsNext

बटाट्याची (Potato) भाजी (Potato sabhi) ही अशी भाजी आहे जी किती तरी जणांना आवडते. बटाटा वडा (Batata vada) किंवा वडापाव (Vada pav) म्हटलं की कित्येकांच्या तोंडाला पाणीच सुटतं आणि फ्रेंच फ्राइझ (French fries) तर काय बहुतेकांचा फेव्हरेट स्नॅक्सच आहे. असा हा बटाटा (Benefits of potao), त्यापासून बनलेले पदार्थ कितीही आवडत असले तरी वजन वाढेल या भीतीने खाणं टाळलं जातं.

एखादी लठ्ठ व्यक्ती दिसली की  अरे काय तू बटाट्यासारखा झाला आहेस असं म्हणत त्या व्यक्तीला बटाट्याचीच उमपा दिली जाते. लठ्ठ व्यक्तीची फक्त बटाट्याशी तुलनाच नाही तर बटाटा खाल्ल्याने लठ्ठ व्हायला होतं, असंही सांगितलं जातं. पण खरंच  बटाट्याने वजन वाढतं का, बटाट्यामुळे आपण लठ्ठ होतो का?

डॉ. सिद्धार्थ भार्गव यांनी याचं उत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. डॉ. सिद्धार्थ भार्गव यांनी सांगितलं, बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे. हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे. पण बटाट्यामुळे तुम्ही फॅट होत नाही कोणत्याच घटकामध्ये वजन वाढवण्याची आणि घटवण्याची क्षमता नसते. तुम्ही बटाटा कसा खाता यावर सर्व अवलंबून आहे.

उदाहरणार्थ तुम्ही दिवसातून एकदा बटाट्याची भाजी खाल्ली तर काहीच हरकत नाही. पण बटाट्याची भाजी तुम्ही फ्राइझप्रमाणे खाल त्यासोबत तुम्ही मोठा बर्गर आणि एक ग्लासभर मिल्कशेक प्यायलात. त्यानंतर पोटॅटो फ्राइझमुळे वजन वाढलं, असं म्हणाल तर ते चुकीचं आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे तुम्हालाही बटाट्याचे पदार्थ आवडत असतील तर वजन वाढेल या भीतीने खाणं टाळू नका. डॉ. भार्गव यांनी नेमकं काय सांगितलं ते लक्षात ठेवा आणि बटाट्याचे पदार्थ मनसोक्त खा.

Web Title: does potato increase your weight know the truth from expert Siddharth Bhargava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.