खरंच बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं असं वाटतं का? एक्सपर्ट काय सांगतात वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 04:12 PM2023-07-15T16:12:16+5:302023-07-15T16:20:05+5:30
Weight Loss Tips : जर वजन कमी करायचं असेल तर रोज बटाटे खा. इतकेच नाही तर तुम्ही 5 दिवस केवळ बटाटे खा, याने तुमचं वजन कमी होईल असाही दावा या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.
Weight Loss Tips : सामान्यपणे सगळ्याच वजन कमी करणाऱ्या लोकांच्या मनात हीच धारणा असते की, बटाटे खाल्ल्यामुळे वजन अधिक वाढतं. पण यात किती तथ्य आहे हे कुणालाही माहीत नसतं. तसेच एक्सपर्टही सांगतात की, वजन कमी करत असताना कार्बोहायड्रेट्सपासून दूर रहा किंवा फार कमी प्रमाणात सेवन करा. मात्र, आज आम्ही तुम्हाला बटाट्याची एक खास डाएट सांगणार आहोत, ज्यात 5 दिवसांपर्यंत केवळ बटाटे खायचे आहेत.
जर्नल मॉलिक्युलर ऑफ न्यूट्रिशन अॅन्ड फूड रिसर्चमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जर वजन कमी करायचं असेल तर रोज बटाटे खा. इतकेच नाही तर तुम्ही 5 दिवस केवळ बटाटे खा, याने तुमचं वजन कमी होईल असाही दावा या रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे बटाटे खाल्ल्यानंतर भूकेची सतत जाणीव होत नाही. भूक लागत नाही. तसेच पोट लवकर भरतं आणि तुम्ही ओव्हरइंटिंग करणार नाहीत.
कॅलरी कमी होतात
या रिसर्चनुसार, बटाटे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात, कारण हे एक असं स्टार्ची फूड आहे ज्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त असतं. आणि कॅलरी कमी असतात. सोबतच मेटाबॉलिज्मला वाढवण्यासोबतच वजन कंट्रोल करण्यासही याने मदत मिळते.
वजन कमी करतं
एका मध्यम आकाराच्या बटाट्यात 168 कॅलरी असतात तर उकडलेल्या बटाट्यात केवळ 100 कॅलरी असतात. तज्ज्ञांचं असं मत आहे की, बटाट्याने वजन कमी होतं, मात्र आरोग्याचं नुकसान होत नाही. बटाटे तुम्ही दिवसातून 10 जरी खाल्लेत तरी तुम्ही इतर पदार्थांपेक्षा कमीच कॅलरी यातून सेवन कराल. सोबतच हेल्दीही रहाल.
बटाट्याचे फायदे
बटाट्यामध्ये फायबर आणि प्रोटीनऐवजी व्हिटॅमि बी, सी, आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नीज, फॉस्फोरससारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. उकडलेले दोन-तीन बटाटे सालीसह दह्यासोबत खाल्ले एक संपूर्ण आहार तुम्हाला मिळेल. बटाटे तळून मसाले लावून, तूप लावून खाल्लेत तर चिकट पदार्थ पोटात जातात. यानेच लठ्ठपणा वाढतो. पण बटाट्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही.
बटाट्याची साल फायदेशीर
बटाट्याची साल अनेकजण फेकून देतात. पण बटाट्याची साल खाल्ल्याने जास्त शक्ती मिळते. इतकेच काय तर बटाटे ज्या पाण्यात उकडले ते पाणीही फेकू नका. त्याचा भाजीचा रस्सा तयार करावा. या पाण्यात भरपूर मिनरल्स आणि व्हिटॅमिन असतात.