​मोजे काढताच पायांची दुर्गंधी येते का? या उपायांनी करा दूर !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2017 07:11 AM2017-04-29T07:11:07+5:302017-04-29T12:41:07+5:30

उन्हाळ्यात बहुतांश लोक घामाच्या समस्येने त्रस्त असतात, मात्र शूज-मोजे यांमुळे येणाऱ्या दुर्गंधीने कित्येकांवर लाजिरवाणा प्रसंग ओढवला जातो. या समस्येपासून मुक्तता हवी असल्यास आपण काही घरगुती उपाय करु शकता.

Does the stomach get rid of the socks? Take away from these remedies! | ​मोजे काढताच पायांची दुर्गंधी येते का? या उपायांनी करा दूर !

​मोजे काढताच पायांची दुर्गंधी येते का? या उपायांनी करा दूर !

googlenewsNext
्हाळ्यात बहुतांश लोक घामाच्या समस्येने त्रस्त असतात, मात्र शूज-मोजे यांमुळे येणाऱ्या दुर्गंधीने कित्येकांवर लाजिरवाणा प्रसंग ओढवला जातो. या समस्येपासून मुक्तता हवी असल्यास आपण काही घरगुती उपाय करु शकता. जाणून घेऊया त्या उपायांबाबत...

* शूज काढल्यानंतर कोमट पाण्यात मीठ मिक्स करा आणि त्यात १५ ते २० मिनिटासाठी पाय टाकून ठेवा. यामुळे पायांपासून येणारी दुर्गंधी दूर होईल, सोबत थकवादेखील मिटेल.

* पाण्यात व्हिनेगर टाका आणि एका आठवड्यापर्यंत रोज ३० मिनिटासाठी त्यात पाय टाकून ठेवावे. यामुळे दुर्गंधी तर दूर होईल शिवाय बॅक्टेरियाचे संक्रमणपासून बचाव होईल.

* चहामध्ये असलेले अ‍ॅन्टि-आॅक्सिडेंट संक्रमणापासून आपला बचाव करते आणि दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरियादेखील नष्ट करते. यासाठी एक ग्लास पाण्यात दोन टी बॅग टाका आणि त्याला ऊब द्या. आता या पाण्याला सामान्य पाण्यात मिक्स करा आणि ३० मिनिटासाठी पायांना त्यात भिजून ठेवा. असे केल्याने आपणास नक्की दुर्गंधीपासून सुटका मिळेल. 

* जर हे सर्व उपाय करण्यासाठी वेळ मिळतच नसेल तर रोज अंघोळ झाल्यानंतर पायांना पावडर लावा. यामुळे पायांना घाम येणार नाही आणि दुर्गंधीदेखील दूर होईल. 

* याशिवाय मोजे खरेदी करताना त्याच्या कापडाची गुणवत्ताही तपासा. यासाठी नॉयलॉन आणि कॉटनच्या मोज्यांना प्राधान्य द्या. कारण असे मोजे घाम कोरडे करण्यास मदत करतात ज्यामुळे दुर्गंधी येत नाही.  

Web Title: Does the stomach get rid of the socks? Take away from these remedies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.