Weight loss tips: गरमीत गारेगार उसाचा रस पिताय? पण उसाच्या रसामुळे वजन वाढतं का? जाणून घ्या सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 04:29 PM2022-04-10T16:29:43+5:302022-04-10T16:34:58+5:30

तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, उसाच्या रसात किती कॅलरीज आहेत आणि त्यामुळे वजन वाढू शकते का? त्यात साखरेचं प्रमाण किती आहे? शिवाय आरोग्यावर काही परिणाम होतो का? 

Does sugarcane juice cause weight gain? Knowing | Weight loss tips: गरमीत गारेगार उसाचा रस पिताय? पण उसाच्या रसामुळे वजन वाढतं का? जाणून घ्या सत्य काय?

Weight loss tips: गरमीत गारेगार उसाचा रस पिताय? पण उसाच्या रसामुळे वजन वाढतं का? जाणून घ्या सत्य काय?

googlenewsNext

उन्हाळा सुरु झाला आहे आणि दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळाही प्रत्येकाला जाणवतायत. अशा दिवसात शरीराला थंडावा मिळावा तसंच थकवा दूर करण्यासाठी उसाचा रस एक उत्तम पर्याय मानला जातो. पण जेव्हा आरोग्य आणि वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा उसाचा रस पिणं योग्य आहे का?  जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, उसाच्या रसात किती कॅलरीज आहेत आणि त्यामुळे वजन वाढू शकते का? त्यात साखरेचं प्रमाण किती आहे? शिवाय आरोग्यावर काही परिणाम होतो का? 

उसाच्या रसातील पोषण घटक
२४० मिली. उसाच्या रसात २५० कॅलरी असतात. ज्यामध्ये ३० ग्रॅम नॅचरल शुगर असते. उसाच्या रसात कोलेस्ट्रॉल, फायबर, तसंच प्रोटीन याची मात्रा शून्य असते. मात्र यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसंच लोहं यांचा समावेश असतो.

उसाच्या रसामध्ये प्रत्येक ग्लासात १३ ग्रॅम आहारातील फायबर असतं, जे फायबरच्या दैनंदिन मूल्याच्या ५२ टक्के असते. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरच्या मते, बहुतेक अमेरिकन लोकं दररोज फक्त १० ते १५ ग्रॅम फायबर खातात, तर शिफारसीनुसार, दररोजंच सेवन २० ते ३५ ग्रॅम इतकं असतं. उसाच्या रसामध्ये फॅट नसतं, परंतु त्यात ३० ग्रॅम साखरेचं प्रमाण असतं. उसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखर असते, कारण त्यातील फायबर काढून टाकलं जातं. 

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या शिफारसीनुसार, तुम्ही दररोज ६ ते ९ चमचे साखरेचं सेवन मर्यादित करा कारण जास्त साखरेचं सेवन लठ्ठपणा आणि वजन वाढण्याची शक्यता वाढवते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल तर उसाच्या रसाचं सेवन करावं का यासाटी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Web Title: Does sugarcane juice cause weight gain? Knowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.