जास्त घाम गेल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या काय आहे सत्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 10:56 AM2024-08-08T10:56:54+5:302024-08-08T10:57:29+5:30

Sweating Help Lose Weight: खरंच जास्त घाम गेल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते का? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. यात किती तथ्य आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Does sweating help you to lose weight know the truth | जास्त घाम गेल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या काय आहे सत्य...

जास्त घाम गेल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या काय आहे सत्य...

Sweating Help Lose Weight: वजन कमी करण्याचा विषय जेव्हा निघतो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लोक वेगवेगळे व्यायाम करतात. व्यायाम करताना असताना जेवढा जास्त घाम जाईल तेवढी वजन कमी करण्यास मदत होईल असं सांगितलं जातं. पण खरंच जास्त घाम गेल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते का? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. यात किती तथ्य आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

सामान्य असं मानलं जातं की, जास्त घाम आल्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत मिळते. पण मग हिवाळ्यात तर जास्त घाम येत नाही. मग हिवाळ्यात तुमच्या शरीरातून अजिबातच फॅट बर्न होत नसेल. या लॉजिकनुसार डोंगराळ भागात किंवा थंड ठिकाणांवर राहणारे लोक लठ्ठपणाचे शिकार व्हायला पाहिजेत. कारण त्या ठिकाणांवर फार घाम येत नाही. तसेच एक सामान्य धारणा अशी आहे की, हिवाळ्यात तुमचं वजन वाढतं आणि उन्हाळ्यात कमी होतं. 

काय सांगतं सायन्स?

आपल्या शरीरात एडिपोज टिशूच्या रुपात फॅट(चरबी) जमा होते. जेव्हाही शरीराची एनर्जी गरज बाहेरुन पूर्ण होत नाही तेव्हा शरीर या जमा झालेल्या फॅटला एनर्जी मध्ये बदलतं आणि आपण फॅट कमी करतो. तुम्ही हिवाळ्यात वर्कआउट करा किंवा उन्हाळ्यात शरीरातून फॅट बर्न होण्याची प्रक्रिया एकसारखीच आहे. 

घामाच्या रूपात फॅट बाहेर येतं?

असं अजिबात होत नाही. शरीराचं तापमान संतुलित करण्यासाठी घाम येतो. उन्हाळ्यात बाहेरचं तापमान इतकं जास्त असतं की, शरीराला थंड ठेवण्यासाठी खूप जास्त घाम येतो. तेच हिवाळ्यात जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा शरीरातील तापमान कमी करण्यासाठी घाम येतो.

उन्हाळ्यात वजन वाढतं?

वजन वाढणं हे वातावरणावर नाही तर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर अवलंबून असतं. जेव्हा तुमच्या खाण्यात कॅलरीचं प्रमाण फार जास्त असतं तेव्हा कॅलरी फॅट स्वरुपात शरीरात जमा होतात आणि जाडेपणा वाढतो. जेव्हा शरीरात कॅलरी कमी होतात तेव्हा शरीरातील फॅट एनर्जी होऊन निघून जातं आणि याने वजन कमी होतं. 
 

Web Title: Does sweating help you to lose weight know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.