टाइटफिट, हायहिल्स, हेवी ज्वेलरी नेहेमीच वापरता का? मग तुम्हाला या आजारांचा धोका आहे!

By admin | Published: May 8, 2017 06:52 PM2017-05-08T18:52:05+5:302017-05-08T18:52:05+5:30

कपडे, चपला, ज्वेलरी यांची चुकीची फॅशन जर कायम फॉलो केली तर अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना तोंड द्यावं लागतं.

Does Titfit, Highhills, Heavy Jewelery Always Be Used? Then you are at risk of these diseases! | टाइटफिट, हायहिल्स, हेवी ज्वेलरी नेहेमीच वापरता का? मग तुम्हाला या आजारांचा धोका आहे!

टाइटफिट, हायहिल्स, हेवी ज्वेलरी नेहेमीच वापरता का? मग तुम्हाला या आजारांचा धोका आहे!

Next


- मृण्मयी पगारे

फॅशन ट्रेण्ड  सतत बदलत राहतो. फॅशनच्या बरोबरीनं राहायला तर सर्वांनाच आवडतं. कपड्यांच्या फॅशनपासून पायातल्या जोड्यापर्यंत सर्व काही नेहेमी बदलत असतं. हे सर्व आपल्यालाही घालून बघता यावं यासाठी अनेकजण धडपड करत असतात. अशा धडपडीतून फॅशन तर व्यवस्थित फॉलो होते. पण शरीर आणि मनाच्या आरोग्यावर मात्र विपरित परिणाम होतो.
कधीमधी फॅशनच्या बरोबरीनं राहण्यात काही वाईट नाही. पण जी फॅशन फॉलो करताना आपल्या शरीराला त्रास होतो ती फॅशन आपण नेहेमी करावी का? हा प्रश्न आहे.
कपडे, चपला, ज्वेलरी यांची चुकीची फॅशन जर कायम फॉलो केली तर अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांना तोंड द्यावं लागतं.

 अतीघट्ट जीन्स
जीन्स हा प्रकार सर्वच वयोगटातल्यांना आवडतो. जीन्स घातल्यानं आपण काहीतरी फॅशनेबल केलं आहे असंही अनेकांना वाटतं. जीन्स घालणं अनेकांना सोयिस्करही वाटतं पण जे सोयिस्कर वाटतं ते आपल्यासाठी अनुरूप असतं असं नाही. तेच जीन्सच्या बाबतीतही होतं. कधी कधी काही जीन्स अंगात चढवणं म्हणजे केवळ दिव्य असतं. पण अशा जीन्स अंगात घातल्यानं आपण बारीक दिसतो, आपलं वाढलेलं पोट लपतं म्हणून कशाबशा होणाऱ्या जीन्स घालण्याचा अनेकींचा हट्ट असतो. पण त्यामुळे तात्पुरतं छान दिसत असलो तरी त्यामुळे आजारांना आणि त्रासाला मात्र आमंत्रण मिळतं. सतत घट्ट जीन्स घातल्यानं पायांना बधिरता येवू शकते. पायांना सतत मुंग्या येतात. घट्ट जीन्समुळे पोट कंबर आवळ्ली जाते. पोट सतत आवळल्याच्या स्थितीत असलं तर ‘अ‍ॅसिड रिफ्लक्स’ नावाचा आजार जडतो. या आजारात पोटातलं अन्न परत अन्ननलिकेत येतं. टाइट जीन्समुळे ‘कंपार्टमेंट सिंड्रोम’ नावाचा आजार होवू शकतो. यात पायावर्, पोटावर कमालीचा ताण येतो.

 

                
 फिटिंग्ज ब्रा
आकर्षक दिसण्यासाठी फिटिंग्ज ब्रा वापरण्याची फॅशन आहे. पण या ब्रा अनेकदा सोसवत नाही इतक्या फिट असतात. यामुळे मानेभोवतीचं दुखणं वाढतं. गळा, खांदे, पाठ आणि स्तनही सतत भरून आल्यासारखे वाटतात. यामुळे फक्त शारीरिक त्रास होतो असं नाही तर आत्मविश्वास डळमळीत होण्यासारखे मानसिक परिणामही दिसून येतात.
बॉडी शेपर
हल्ली तुमचं पोट दिसतं म्ह्णून अमूक पट्टा बांधा, अमूक प्रकारचे इनरवेअर घाला अशा जाहिराती येतात. त्याला भुलून अनेकजणी आपल्या पोटाचा आकार कमी करण्यासाठी ते वापरतातही. पण यामुळे फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो. बॉडी शेपरमुळे पोट सतत आवळल्याच्या स्थितीत राहातं. त्यामुळे अ‍ॅसिड रिफलक्स , छातीत जळजळ होणे यासारखे विकार होतात.

Web Title: Does Titfit, Highhills, Heavy Jewelery Always Be Used? Then you are at risk of these diseases!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.