खरंच पाणी प्यायल्यानं वजन वाढतं?, जाणून घ्या 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 06:02 PM2019-03-28T18:02:37+5:302019-03-28T18:04:55+5:30
अनेकजणांना ब्लॉटेड म्हणजेच पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यांना असं वाटतं की, जास्त न जेवताही त्यांचं पोट भरल्याप्रमाण वाटतं आणि एक्सरसाइज केल्यानंतरही तुम्हाला हलकं वाटत नाही.
(Image Credit : violetweightloss.com)
अनेकजणांना ब्लॉटेड म्हणजेच पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यांना असं वाटतं की, जास्त न जेवताही त्यांचं पोट भरल्याप्रमाण वाटतं आणि एक्सरसाइज केल्यानंतरही तुम्हाला हलकं वाटत नाही. अशातच प्रश्न असा पडतो की, पाण्यामुळे त्यांचं वजन वाढतं का? जाणून घेऊया काय आहे ही परिस्थिती आणि का असं वाटतं?
का होतं असं?
सतत व्यायाम आणि योगाभ्यासानंतर जर तुमचं वजन कमी होत नसेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. असं असू शकतं की, वॉटर वेट तुमच्या शरीराच्या वजनाचं आकलन करू देत नसेल. द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्ही प्रत्येक वेळी ब्लॉटेड फिल करत असाल तर असं असू शकतं की, वॉटर वेट तुमचं वजन कमी न होण्याचं कारण आहे. जाणून घ्या का होत आहे असं?
वॉटर वेट काय आहे?
जेव्हा फ्लूइड टिश्यूमध्ये एकत्र होतं तेव्हा ते सूज येण्याचं कारण होतं. वॉटर वेट, तो हिस्सा असतो जिथे शरीर फ्लूइड एकत्र होतं आणि साधरणतः हे किडनीच्या आसपास एकत्र होतं. फ्लूइड बाहेर फ्लश करण्याऐवजी आपलं शरीर अवयव आणि त्वचेमध्ये एकत्र होतात. वॉटर वेटमुळे वाढलेलं वजन तुमचं खरं वजन नसतं.
कार्ब्स आहे मुख्य कारण
वॉटर गेन करण्याच्या मुख्य कारणांमध्ये मीठ आि कार्ब्सचा समावेश असतो. जास्त मीठ खाल्याने सोडियम पाण्यासोबत शरीरामध्ये विरघळून अडकल्यासारखं होतं. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करता तेवढं वॉटर वेट वाढण्याची शक्यता वाढते. अधिक कार्ब्सचं सेवनंही आपल्याला असचं प्रभावित करतं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जेव्हा आपण अधिक प्रमाणात कार्ब्स खातो, तेव्हा आपलं शरीर त्यांना लगेच अब्जॉर्ब करत नसून ते ग्लाइकोजनच्या स्वरूपात एकत्र होत राहतात. ग्लाइकोजन अधिक पाणी अब्जॉर्ब करतं, ज्यामुळे वॉटर वेट वाढण्याची शक्यता वाढते.
अशाप्रकारे वॉटर वेट गेन रोखू शकता :
- मीठाचं अधिक सेवन करणं टाळा.
- जास्त पाणी प्या, जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर त्याचाही परिणाम शरीरावर होत असतो.
- जास्त चहा, कॉफी आणि मद्यसेवन करणं टाळा.
- नियमितपणे एक्सरसाइज करा ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- हायड्रेटिंग पदार्थ खा