गायी-म्हशीच्या दुधापेक्षाही गाढविणीचं दूध अधिक शक्तिशाली? बाबा रामदेवांनी पिऊन सांगितले फायदे; म्हणाले- 'सूपर टॉनिक'!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:09 PM2024-12-03T17:09:59+5:302024-12-03T17:11:14+5:30

पतंजली योगपीठात योगसाधना करताना बाबा रामदेव यांनी गाढविणीचे दूध काढले, ते प्यायले आणि त्याचे अद्भुत आरोग्यदायी फायदेही सांगितले.

Donkey milk more powerful than cow-buffalo milk Baba Ramdev drank it and said super tonic | गायी-म्हशीच्या दुधापेक्षाही गाढविणीचं दूध अधिक शक्तिशाली? बाबा रामदेवांनी पिऊन सांगितले फायदे; म्हणाले- 'सूपर टॉनिक'!

गायी-म्हशीच्या दुधापेक्षाही गाढविणीचं दूध अधिक शक्तिशाली? बाबा रामदेवांनी पिऊन सांगितले फायदे; म्हणाले- 'सूपर टॉनिक'!

योगगुरू बाबा रामदेव यांनी आता गाय, म्हैस अथवा शेळी नव्हे, तर गाढविणीचे दूध 'सुपरफूड' असल्याचे म्हटले आहे. पतंजली योगपीठात योगसाधना करताना बाबा रामदेव यांनी गाढविणीचे दूध काढले, ते प्यायले आणि त्याचे अद्भुत आरोग्यदायी फायदेही सांगितले. बाबा रामदेव यांचा हा अनुभव त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही शेअर करण्यात आला आहे. 

बाबा रामदेव म्हणाले, गाढविणीचे दूध इतर प्राण्यांच्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक असते. त्यात लॅक्टोफेरिन नामक घटक मुबलक प्रमाणात आढळतो. जो एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या डॉक्टरांनीही याची पुष्टी केली. ते म्हणाले, गाढविणीचे दूध आरोग्य आणि सौंदर्य दोन्हींसाठीही फायदेशीर आहे. यामुळे त्वचा तर उजळतेच, शिवाय वाढत्या वयाचा प्रभावही कमी होतो.

गढवीनीचे दूध सौंदर्याचे रहस्य - 
यावेळी बाबा रामदेव यांनी इजिप्शियन राणी क्लियोपेट्राचेही उदाहरण दिले. जी तिच्या सौंदर्यासाठी गाढविणीच्या दुधाने आंघोळ करायची. ही प्राचीन परंपरा आजही प्रभावी असल्याचे बाबा रामदेव म्हणाले. एवढेच नाही तर, हे दूध “सुपर कॉस्मॅटिक” असून त्वचेसाठीही वरदान असल्याचे ते म्हणाले. 

अ‍ॅलर्जी असलेल्या लोकांसाठी सुरक्षित -
डॉक्टरांच्या मते, ज्या लोकांना गाय अथवा म्हशीच्या दुधाची अ‍ॅलरिजी आहे, त्यांच्यासाठी गढवीनीचे दूध फायद्याचे आहे. हे केवळ पचायलाच नाही तर, यातील चांगले बॅक्टेरिया अ‍ॅटीऑक्सीडेन्ट आणि अँटी-एजिंगचे काम करते.

गढवीनीचे दूध व्हिटॅमिन आणि मिनरल्स युक्त -
नॅशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसिननुसार, गाढविणीच्या दुधात व्हिटॅमीन ए, विटामिन डी, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. हे दूध हाडे मजबूत करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. लोकांसाठी बाबा रामदेव यांचा हा दावा आरोग्याच्या एका नव्या पर्यायाकडे निर्देश करणारा आहे.

Web Title: Donkey milk more powerful than cow-buffalo milk Baba Ramdev drank it and said super tonic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.