हिवाळ्यात आळसावलेले राहू नका, जागे व्हा आणि पुढे जात राहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 03:49 AM2020-01-19T03:49:43+5:302020-01-19T03:50:10+5:30
झोपेचा त्रास, आनंद कमी होणे, भूक बदलणे जसे की, गोड खाण्याची इच्छा होणे, वजन वाढणे, अपराधीपणाची भावना, एकटेपणा, असाहाय्य किंवा निराशा यासारख्या अनेक लक्षणांमुळे हिवाळ्यातील दैनिक चक्र बदलत आहे.
- रश्मी जी. सोमानी
(न्युट्रीशियन आणि लाईफस्टाईल एमजीटी कोच, न्युट्रिक्युअर क्लिनिक)
झोपेचा त्रास, आनंद कमी होणे, भूक बदलणे जसे की, गोड खाण्याची इच्छा होणे, वजन वाढणे, अपराधीपणाची भावना, एकटेपणा, असाहाय्य किंवा निराशा यासारख्या अनेक लक्षणांमुळे हिवाळ्यातील दैनिक चक्र बदलत आहे.
जरी या बदलांची अचूक कारणे अस्पष्ट असली तरी सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे मेंदूतून होणाऱ्या सेरोटोनिनच्या स्रोताची पातळी कमी होते, ज्याच्यामुळे आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि एकूणच मूड यावर परिणाम होऊ शकतो. तसेच, लांब रात्र आणि लहान दिवस यामुळे मेलाटोनिनचा स्रोत जास्त होऊ शकतो, ज्यामुळे आळशीपणाची भावना उद्भवू शकते.
लक्षणे : झोपेच्या सवयीमधील बदल, विशेषत: झोपेची प्रवृत्ती, शारीरिक हालचाल कमी होणे, थकवा, कंटाळा येणे, कमी एकाग्रता, भूक बदलणे, गोड खाण्याची इच्छा होणे, वजन वाढणे, हात-पाय जड वाटणे, चिडचिडेपणा, दु:खी वाटणे.
यातून बाहेर कसे पडायचे?
१) नैसर्गिक प्रकाश आणि व्हिटॅमिन डी : दिवसातून किमान ३० मिनिटे सूर्यप्रकाशात चालण्याने मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यात मदत होते. म्हणूनच मॅरेथॉनमध्ये धावणाºया धावपटूंची हाडे आणि स्नायू मजबूत असतात.
२) व्यायाम : नियमित व्यायामामुळे सेरोटोनिन, आॅक्सिटोसिन आणि डोपामाईनसारखे चांगले हार्मोन्स वाढण्यास मदत होते. हेच कारण आहे की, मॅरेथॉन सामान्यत: हिवाळ्यामध्ये धावतात, जेणेकरून हार्मोनल संतुलन उन्नत करतात.
३) पोषण : संतुलित आहार घेतल्यामुळे जसे की, कठीण कवचाची फळे/बिया, मासे, सेंद्रिय अंडी यापासून ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स मिळतात जे पोटातील सूक्ष्म जीवांसाठी उपयुक्त असतात. रोज आहारात प्रीबायोटिक्स जसे की, सर्व हिरव्या भाज्या, फळ आणि प्रोबियटिक्स जसे की, दही आणि आंबलेले पदार्थ, ऊस रस आणि गूळ यांचा समावेश करावा. हे सर्व मॅरेथॉनर्सच्या पोषणासाठी आवश्यक आहेत
४) झोप : रोज रात्री ७ ते ८ तास झोप घेऊन तंत्रज्ञान आपल्या बेडरूमच्या बाहेर ठेवा.
५) इतरांशी कनेक्ट राहा : आपल्या स्वत:च्या शारीरिक, भावनिक, रिलेशनल आणि मानसिक आरोग्याच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसा वेळ द्या. मॅरेथॉन धावपटू एकमेकांना कनेक्ट होण्यास मदत करतात आणि त्याद्वारे एक समग्र दृष्टिकोन आणि चांगले मानसिक आरोग्य देतात.