ग्रीन टी पिताना घ्या ही काळजी, या गोष्टींसाठी घ्या ग्रीन टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 11:18 AM2018-04-26T11:18:57+5:302018-04-26T18:18:26+5:30

वजन घटवणे, झोप न येणे, तणाव दूर करणे असे अनेक फायदे ग्रीन टी पिण्याचे फायदे आहेत. पण ग्रीन टी घेताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

Don't do these mistake while drinking green tea | ग्रीन टी पिताना घ्या ही काळजी, या गोष्टींसाठी घ्या ग्रीन टी!

ग्रीन टी पिताना घ्या ही काळजी, या गोष्टींसाठी घ्या ग्रीन टी!

googlenewsNext

फिट आणि निरोगी राहण्यासाठी आता अनेकजण ग्रीन टी पिण्याकडे वळले आहेत. ग्रीन टी पिण्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, असं सांगितलं जातं. त्यामुळे सगळ्यांनी याकडे मोर्चा वळवला आहे. वजन घटवणे, झोप न येणे, तणाव दूर करणे असे अनेक फायदे ग्रीन टी पिण्याचे फायदे आहेत. पण ग्रीन टी घेताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तरच त्याचा आरोग्याला फायदा होऊ शकतो.

1)  ग्रीन टीमुळे जरी वजन कमी होत असले तरी तिचे सेवन दिवसातून किती वेळा करावे याबद्दल डॉक्टरांकडून सल्ला घ्या. दिवसातून केवळ एकदा ग्रीन टी पिणे फायद्याचे ठरेल, असे सांगितले जाते.

2) ग्रीन टी वारंवार उकळू नका. एकदा ग्रीन टी बनवल्यानंतर लगेचच तिचे सेवन करा. ती जास्त वेळ तशीच ठेवून देऊ नका किंवा बरीच आधी बनवलेली ग्रीन टी घेऊ नका.

(बॉडी बनवण्याच्या नादात दूधासोबत केळी चुकूनही खाऊ नये, पडू शकतं महागात)

3) ग्रीन टीची चव काहींना आवडते तर काहींना नाही. त्यामुळे तिला अधिक चांगली चव येण्यासाठी अनेक जण त्यात साखर किंवा गूळ टाकतात. पण असे केल्याने त्यातले पोषक तत्वे कमी होतात. त्यामुळे कधीच त्यात साखर किंवा कोणताही गोड पदार्थ टाकू नका.

4) ग्रीन टीचे प्रकार वेगवेगळे आहे. तुळस, लिंबू, पुदीना, जॅस्मिन अशा वेगवेगळ्या प्रकारात ग्रीन टी उपलब्ध आहे. या प्रत्येक प्रकाराचे फायदेही वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की कोणत्या आरोग्याच्या समस्येसाठी त्याचे सेवन करत आहात हे देखील जाणून घ्या.

(उसाचा रस पिण्याचे हे आहेत तोटे, कुणी राहावं सावध !)

5) ग्रीन टी ही दूध किंवा साखर टाकून बनवायची नसते हे लक्षात घ्या. ती बनवताना त्यात दूधही टाकू नका.

यासाठी नक्की घ्या ग्रीन टी

वजन घटवण्यासाठी

ग्रीन टी मधील ‘एपिगॅलोकॅटोकिन’ तुमचे मेटॅबॉलिझम वाढवण्यासाठी तसेच जास्त लागणारी भूक कमी करण्यासाठी मदत करते. ‘एपिगॅलोकॅटोकिन’ घटकामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. 2-4 कप ग्रीन टीमुळे 70-80 कॅलरीज नियमित कमी होतात. यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. ग्रीन टीमुळे भूकेवर नियंत्रण राहतं. तसेच फॅट बर्न होण्याची क्षमता सुधारते.

कर्करोगाशी अधिक सक्षमतेने सामना करण्यासाठी  

‘ग्रीन टी’ मध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीराला कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाशी अधिक सक्षमतेने लढण्यासाठी तयार करतात. या अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकांमुळे शरीरात फ्री  रॅडीकल्सचा प्रभाव कमी होतो. 

कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते

ग्रीन टी शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाणही नियंत्रणात ठेवते. रक्तवाहिन्या मोकळ्या राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते, हृदयाचे कार्य सुरळीत चालते. हृदयरोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ग्रीन टी’ अतिशय आरोग्यदायी आहे. 

रोगप्रतिकारशक्ती वाढते 

‘ग्रीन टी’मध्ये असणारे अ‍ॅन्टीबॅक्टेरिअल घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला नेहमी नेहमी येणारा ताप, अंगदुखीही दूर होण्याची शक्यता असते.

चांगली झोप येण्यास मदत होते

ग्रीन टी मुळे झोप येण्यास, शरीरातील थकवा कमी करण्यास तसेच  कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायामासाठी शारिरीक तयारी होण्यास मदत होते.
पण ग्रीन टी चे फायदे पाहून अतिप्रमाणात तिचे सेवन करू नका. कारण ग्रीन टीचे काही दुष्परिणामदेखील आहेत.
 

Web Title: Don't do these mistake while drinking green tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.