"४ ते ६ वेळेत काहीच खाऊ नका", न्यूट्रिशनिस्टनी सांगितला हेल्दी राहण्याचा खास सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 09:58 AM2024-06-19T09:58:11+5:302024-06-19T09:59:07+5:30
Health Tips : न्यूट्रिशनिस्ट प्रशांत देसाई यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत एक खास सल्ला दिला.
Health Tips : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. लोकांनी एक रूटीन बनवून ठेवलं आहे. बरेच लोक सकाळी लवकर उठतात. एक्सरसाइज करतात, पौष्टिक नाश्ता करतात, ऑफिसला जातात, दुपारी जेवण करतात. काही लोकांचं सगळं काही असं सेट असतं. पण हेच लोक अशा काही चुका करतात ज्यामुळे निरोगी राहण्यासाठी त्यांनी केलेली ही सगळी मेहनत वाया जाते. ती कशी वाया जाते ही आज आपण जाणून घेणार आहोत.
न्यूट्रिशनिस्ट प्रशांत देसाई यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर करत एक खास सल्ला दिला. ते म्हणाले की, "बरेच लोक आजकाल निरोगी आणि फीट राहण्यासाठी अनेक गोष्टी करतात. वेळेवर नाश्ता, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणं सगळंकाही. पण यात ते एक चूक करतात ती म्हणजे ४ ते ६ या वेळेत ते काहीतरी खातात. या वेळेत जर तुम्ही काहीही खाल्लं तर तुमचं दिवसभराचं डिसिप्लीन सगळं वाया जातं. या वेळेत ही चूक करणं तुमच्या आरोग्यासाठी महागात पडू शकते. जास्तीत जास्त लोक या वेळेत ऑफिसमध्ये किंवा घरीही चहा बिस्कीट, समोसे, सॅंडविच असे काही पदार्थ खातात. त्यानंतर रात्रीच जेवण आणि नंतर लेट नाइट काही खाणं. मग झोपणं. हे फार चुकीचं रूटीन आहे".
त्यांनी पुढे सांगितलं की, "जंक किंवा फास्ट फूड खाण्याऐवजी तुम्ही ३.३० वाजता एक ग्लास पाणी प्या किंवा लिंबूपाणी प्या. तरीही तुम्हाला भूक लागली असेल तर काही ड्राय फ्रुट्स खाऊ शकता. तरीही भूक गेली नसेल तर मग प्रोटीन शेक घेऊ शकता. या गोष्टी तुम्हाला हेल्दी ठेवू शकतात. त्यामुळे ४ ते ६ या वेळेत कधीही इतर काही खाऊ नका".