कोरोनात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा हा नवा ट्रेण्ड ठरू शकतो घातक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 01:13 PM2021-05-18T13:13:02+5:302021-05-18T13:13:57+5:30
कच्च्या भाज्या खाल्ल्याने भाज्यांमधील पोषकतत्व व फायबर थेट शरीराला मिळते असा समज आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते कच्च्या भाज्या शरीराला अपायकारक ठरू शकतात.
सध्याच्या कोरोनाकाळात (corona) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातात. कच्च्या भाज्या खाणे हा त्यातलीच एक नवा ट्रेंड. काही लोक वजन घटवण्यासाठी कच्च्या भाज्या खातात. कच्च्या भाज्या खाल्ल्याने भाज्यांमधील पोषकतत्व व फायबर थेट शरीराला मिळते असा समज आहे. त्यात तथ्यही आहे. पण आयुर्वेदिक डॉक्टरांचे याबाबत वेगळेच म्हणने आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मते कच्च्या भाज्या शरीराला अपायकारक ठरू शकतात.
कच्च्या भाज्या खाण्यासंदर्भात बंगळुरचेआयुर्वेद वैद्य डॉ. शरद कुलकर्णी M.S (Ayu),(Ph.D.)यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या उत्तम आरोग्यासाठी या गोष्टी आपण जरूर ऐकल्या पाहिजेत.
कच्च्या भाज्या खाण्याचे तोटे
- डॉ. कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार कच्च्या भाज्यांवर अनेक प्रकारचे जीवाणू व विषाणू असण्याची शक्यता असते. अशा भाज्यांचे सेवन केल्यास हे जीवाणू, विषाणू शरीरात प्रवेश करतात. हे आपल्या आरोग्यासाठी फार घातक ठरु शकते. तसेच या भाज्यांवर धुळ, माती जमलेली असते. ती पोटात जाणे निश्चितच अपायकारक आहे.
- कच्च्या भाज्या पचनासाठीही जड असतात. त्यामुळे पोटाशी संबधित अनेक आजार उद्भवू शकतात. शिजवलेल्या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतं.
अशापद्धतीने खाऊ शकता कच्च्या भाज्या
डॉ. शरद कुलकर्णी यांच्या मते कच्च्या भाज्या खाण्यापूर्वी नीट धुवून घ्याव्यात. काहीवेळा फक्त भाज्या धुवून घेणे फायदेशीर नसते तर तुम्ही त्या गरम पाण्यातही ठेऊ शकता. त्यात हळद आणि मीठ घालु शकता. तुम्ही भाज्या उकळूनही खाऊ शकता. यामुळे कोणताही अपाय होणार नाहीच पण आवश्यक ती पोषकद्रव्ये तुम्हाला मिळतील.
कच्च्या भाज्या खाणं पूर्णपणे बंद करायच्या का?
तर अजिबात नाही. तुम्ही सॅलड्स खाऊ शकता. पण दक्षता घ्या की तुम्ही त्या पाण्यामध्ये थोड्या उकळून घ्या. पावसाळ्याच्या दिवसात तर या पद्धतीनेच भाज्या खाणं योग्य आहे.